शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : मावळमध्ये राष्ट्रवादीला धक्का; पुणे जिल्हा बँकेचे संचालक नेवाळे समर्थकांसह भाजपात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 18:44 IST

ऐन निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका...

ठळक मुद्देदोनच दिवसापूर्वी त्यांनी दिला होता जिल्हा बॅक व जिल्हा दूध संघाचा संचालक पदाचा राजीनामा

वडगाव मावळ :  पुणे जिल्हा बॅकेचे संचालक, तसेच पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्यासह हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून मंगळवारी ( दि. १५ ऑक्टो.)  भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मावळ विधासभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब नेवाळे हे तीव्र इच्छुक होते. परंतु त्यांना उमेदवारी नाकारून भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सुनील शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे नेवाळे हे नाराज होते. दोनच दिवसापूर्वी त्यांनी जिल्हा बॅक व जिल्हा दूध संघाचा संचालक पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घ्यायची घोषणा केली. त्या पाठोपाठ  त्यांचे भाचे पंचायत समितीचे सदस्य दतात्रय शेवाळे यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेनंतर नेवाळे यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊ नये इतर कोणत्याही पक्षात जावे यासाठी ग्रामीण भागातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या  गोवित्री गावातील घरासमोर ठिय्या आंदोलन केले. यानंतर त्यांनी राजकारणातील निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. 

ऐन निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका... बाळासाहेब नेवाळे, पंचायत समिती सदस्य दतात्रय शेवाळे यांच्यासह हजारो कार्यकर्ते तळेगाव येथील भाजपच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे. याबाबत बाळासाहेब नेवाळे यांना विचारले असतात आज काहीतरी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.आणि तो निर्णय संध्याकाळी दिसेलच. 

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळmaval-acमावळNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक