शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत महामेट्रोला वृक्ष लागवडीसाठी मिळेना मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 12:49 IST

महापालिकेने वर्षभरात ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांपैकी चार हजार झाडे लावण्याची जबाबदारी मेट्रोने घेतली आहे. 

ठळक मुद्देमहापालिका उद्यान विभाग : साडेचार हजारांपैकी केवळ ३५० वृक्षांचे पुनर्रोपण वृक्ष लागवडीसाठी वेळकाढूपणा सुरूपावसाळ्यात लागवड न केल्याने आता वृक्ष लागवडीसाठी अतिरिक्त पाणी लागणार लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षात आंबा, चिंच, लिंब, वड, साग, पिंपळ अशा झाडांचा समावेश

शीतल मुंडे पिंपरी : शहरातील पर्यावरण संतुलनासाठी महापालिकेने ६० हजार वृक्ष लागवड करण्याचा निश्चय केला आहे. त्यांपैकी चार हजार वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य महापालिकेने मेट्रोला दिले आहे. परंतु, महामेट्रोला अद्यापही वृक्ष लागवडीसाठी मुहूर्त मिळालेला नाही. आतापर्यंत साडेतीनशे वृक्षांची लागवड व पुनर्रोपण केल्याची माहिती महामेट्रो प्रशासनाने दिली आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरी ते दापोडी या मार्गावरून मेट्रोचा मार्ग जाणार आहे. महामेट्रोने काम सुरू केल्याने महापालिकेचे ४६८ मोठे वृक्ष बाधित होणार आहेत. शिवाय ग्रेड सेपरेटरवर उभारलेली शेकडो फुलझाडे व झुडपे नष्ट होत आहेत. त्या बदल्यात महामेट्रोने वृक्षांचे पुनर्रोपण व नव्याने लागवड करण्याचे लेखी पत्र महापालिकेच्या उद्यान विभागाला दिले आहे. त्यानुसार महापालिकेने वर्षभरात ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांपैकी चार हजार झाडे लावण्याची जबाबदारी मेट्रोने घेतली असतानाही वृक्ष लागवडीसाठी वेळकाढूपणा सुरू आहे. मेट्रोकडून सुरुवातीला एचएच्या मैदानावर वृक्षलागवड करण्यात येणार होती. मात्र, एचएने परवानगी नाकारल्याने आता औंध व पिंपळे सौदागर येथील लष्कराच्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. लष्कराकडून वृक्ष लागवडीस परवानगी मिळाली आहे. तरीही मेट्रोकडून वृक्ष लागवडीस सुरुवात झालेली नाही. पावसाळ्यात लागवड न केल्याने आता वृक्ष लागवडीसाठी अतिरिक्त पाणी लागणार आहे. लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षात आंबा, चिंच, लिंब, वड, साग, पिंपळ अशा सर्व झाडांचा समावेश असणार आहे. लागवड केलेल्या झाडांची तीन वर्षे देखभाल करण्याचे काम मेट्रो करणार आहे. पावसाळा संपून थंडी सुरू झाली, तरी मेट्रोकडून अद्याप वृक्षलागवड सुरू झालेली नाही. ..................शहरामध्ये महामेट्रोच्या कामासाठी वृक्ष तोडण्यात आले होते. त्याबदल्यात महापालिकेने महामेट्रोला चार हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य दिले होते. पिंपळे सौदागरमध्ये जागाही उपलब्ध करून देण्यात आली. तरीही वृक्षलागवड करण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्याबद्दल उद्यान विभागाला कोणतीही माहिती मेट्रोने कळविलेली नाही- प्रकाश गायकवाड, उद्यान अधीक्षक (वृक्षसंवर्धन) 

...............पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महामेट्रोच्या कामावेळी वृक्षतोड करण्यात आली. मेट्रोकडून चार हजार वृक्षांची लागवड शहरामध्ये करण्यात येणार आहे. आतापर्यंत ३५० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. महानगरपालिकेने १० एकर जागा वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध करून दिली आहे. एक आॅक्टोबरला महानगरपालिकेचे पत्र मिळाले आहे. त्या जागेची पाहणी केली असून, वृक्ष लागवडीचे काम लवकरच सुरू करणार आहोत. - हेमंत सोनवणे, महाप्रबंधक,जनसंपर्क विभाग, मेट्रो

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो