शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

महाविकास आघाडीकडून टाळ मृदंग घेऊन इंद्रायणी प्रदूषणाबाबत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'गजर'

By विश्वास मोरे | Updated: July 4, 2024 19:17 IST

नदीमध्ये स्नान केल्याने त्वचा रोग व आचमन केल्याने ते आरोग्यास हानिकारक होऊ शकते

पिंपरी : मावळपासून आळंदीपर्यंत वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आळंदीतील सिद्धबेट येथे गुरुवारी एल्गार आंदोलन केले. स्थानिक नागरिक, वारकरी, विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेत, टाळ मृदंग वाजवत इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'गजर' केला.  

पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरापासून इंद्रायणी अक्षरशः फेसाळलेली आहे. तेलकट तवंग दररोज पाण्यावर पसरलेला असतो. याबाबत स्थानिक प्रशासनापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करूनही तोडगा निघालेला नाही. नुकतीच आषाढी पालखी वारी आळंदीतून निघाली. या वारी सोहळ्यासाठी आलेल्या लाखो भाविकांना प्रदूषित इंद्रायणीचे फेसाळलेले पाणी ' आचमन' करावे लागले. यामुळे वारकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या. या भावना सत्ताधाऱ्यांना, राज्यकर्त्यांना कळाव्यात. यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने एल्गार आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

आळंदीतील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शना करीता भाविक ही येत असतात. तसेच ते इंद्रायणी काठी येऊन पवित्र इंद्रायणी नदी मध्ये स्नान करतात तसेच पवित्र जल आचमन करतात. त्यामुळे नदीमध्ये स्नान केल्याने त्वचा रोग व आचमन केल्याने ते आरोग्यास हानिकारक होऊ शकते. जलप्रदूषणा मुळे नदी काठच्या गावातील पाणी पुरवठ्यावर परिणाम  होत आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात इंद्रायणी जलप्रदूषणामुळे केळगावातील नागरिकांना अशुद्ध (काळसर रंग) पाण्याचा पुरवठा झाला होता. स्नान करण्यासाठी सुद्धा अयोग्य असा पाणी पुरवठा त्यावेळी झाला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे जलप्रदूषण रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली नाही त्याला शासन जबाबदार आहेत.  तसेच या जलप्रदूषणा वर आळा बसण्यासाठी जलप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्कता आहे.

 पिंपरी चिंचवड शहरातून इंद्रायणी नदी वाहते. म्हणून दरवर्षी जलपर्णी काढणे , नाल्यांची सफाई, ट्रीटमेंट प्लांट, रिव्हर सायक्लोथॉन अशी दुकानदारी पिंपरी चिंचवडमध्ये सध्या सुरू आहे. सत्ताधारी भाजपने या दुकानदारीच्या नावाखाली कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे. इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्यामुळेच इंद्रायणीची आज गटारगंगा झाली आहे . या सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी आंदोलनात करण्यात आली.

आळंदीतील वारकरी काय म्हणतात

- माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितले वर्षभर इंद्रायणी नदीचे पाणी स्वच्छ राहील.  आणि पुढील ४८ तासात इंद्रायणी चे पाणी स्वच्छ दिसेल पण अजून पाणी अस्वच्छ दिसत आहे.- करोडो रुपयांचा खर्च होऊन सुद्धा जर आमच्या वारकऱ्यांचे श्रध्दा स्थान असलेल्या इंद्रायणी मातेला मोकळा श्वास मिळत नसेल तर नक्की हा पैसा जातो कुठे? याचे उत्तर आता मिळाले पाहिजे.- नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नमामि इंद्रायणी चे खोटे गाजत किती दिवस दाखवणार आहेत.  - नदीच्या काठावर काही ठिकाणी भराव टाकण्यात आले आहेत. अनेकांची हॉटेल इंद्रायणी काठी आहेत त्याचे सांडपाणी व मैला मिश्रित पाणी येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेindrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा