शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

चोरट्यांची एटीएम बॅटऱ्यांवर वक्रदृष्टी, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 04:50 IST

पैसे, युपीएसच्या चोरीनंतर चोरट्यांची आता एटीएममधील बॅट-यांकडे वक्रदृष्टी झाली आहे. मागील दोन महिन्यात चोरट्यांनी चार ठिकाणी बॅट-यांवर डल्ला मारला आहे. त्यामुळे शहरातील एटीएम केंद्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भोसरी : पैसे, युपीएसच्या चोरीनंतर चोरट्यांची आता एटीएममधील बॅटºयांकडे वक्रदृष्टी झाली आहे. मागील दोन महिन्यात चोरट्यांनी चार ठिकाणी बॅट-यांवर डल्ला मारला आहे. त्यामुळे शहरातील एटीएम केंद्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सांगवी व पिंपळे गुरवमध्ये चार विविध ठिकाणच्या आणि विविध बँकांच्या एटीएममधून बॅटºयांची चोरी करत चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. सांगवीतील सृष्टी चौक येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम सेंटर, रामकृष्ण मंगल कार्यालय-त्रिमूर्ती चौक, पिंपळे गुरव आणि जुनी सांगवी या परिसरातील बँक आॅफ इंडिया बँकेचे तीन एटीएम सेंटरमधील १६ बॅटºया व २ युपीएस १६ फेब्रुवारी रोजी चोरल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणातील चोरट्यांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जेरबंद केले. मात्र, अन्य तीन घटनांमधील चोरट्यांच्या शोधात पोलीस असतानाच एचडीएफसी बँकेच्या पिंपळे निलखमधील विशालनगर येथील एटीएममधील सहा बॅटºया चोरट्याने चोरून नेल्याची घटना उजेडात आली. त्यामुळे एटीएम केंद्रांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एका एटीएम सेंटरमध्ये सुमारे चार ते सहा बॅटरी संच लावलेले असतात. एटीएम सेंटरमध्ये वापरण्यात येणाºया बॅटरी भंगारात विकल्यास त्याची चांगली किंमत मिळते. त्यामुळे या बॅटरी चोरण्यासाठी शहरात अशा भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढल्याची ग्राहकांमध्ये चर्चा आहे. एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले असले, तरी त्यांचा उपयोग केवळ नावापुरता किंवा दिखाव्यासाठी होत असल्याचे मागील अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. त्यातच शहरातील बहुतांश एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नाहीत. काही एटीएमचे दरवाजे तुटलेले आहेत. पिंपरी कॅम्पात चक्क किरकोळ वस्तू विक्रीच्या दोन दुकानांमध्ये एटीएम मशिन बसवल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या एटीएम कार्ड गोपनियता व सुरक्षितताही वाºयावर असल्याचे पहायला मिळत आहे. बहुसंख्य एटीएममध्ये दोन मशिन आहेत. त्याठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने एकावेळी अनेक ग्राहक आत शिरतात. त्याचा गैरफायदा चोरटे उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षक तैनात करणे आवश्यक आहे. संबंधित सुरक्षारक्षक सक्षम आणि प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. सुरक्षारक्षक नसल्याचा गैैरफायदा चोरटे घेतात. या प्रकारांना आळा बसला पाहिजे. त्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.सुरक्षारक्षक नाहीत प्रशिक्षित, सक्षमशहरातील बहुसंख्य एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षकांचा अभाव जाणवतो. ज्याठिकाणी सुरक्षारक्षक दिसतात त्यांच्याकडे स्वत:च्याच सुरक्षेची कोणतीही साधने दिसत नाहीत. केवळ ड्रेसकोडवरच सुरक्षारक्षकांचे अस्तित्व आहे. सुरक्षारक्षकांची शरीरयष्टी पाहून यांनाच सुरक्षेची गरज असल्याचे निदर्शनास येते. स्वसंरक्षणाचे अथवा सुरक्षारक्षक म्हणून कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसताना बँकांकडून सुरक्षारक्षक नावालाच एटीएमच्या देखरेखीसाठी ठेवले जात आहेत. त्यामुळे यापूर्वीही सुरक्षारक्षकाला धाक दाखवून अथवा मारहाण करून एटीएम लुटीच्या घटना घडल्या आहेत. प्रशिक्षित आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम तसेच सशस्त्र सुरक्षारक्षकांचीच नेमणूक करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची मागणीअस्वच्छतेबरोबरच मोकाट कुत्र्यांसाठीही एटीएम सेंटर मुक्कामाचे ठिकाणी बनू लागले आहे. संत तुकारामनगर परिसरात एटीएम सेंटरच्या समोरील पायºया तसेच कट्ट्यावर टवाळखोर ठाण मांडून बसलेले असतात. वातानुकूलित एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक खुर्ची मांडून बसलेले असल्याचे दिसून येतात. सेंटर बाहेर सुरक्षेसाठी तैनात राहण्याऐवजी सेंटरमध्ये ग्राहक पैसे काढत असतानाही सुरक्षारक्षकाची असलेली उपस्थिती त्रासदायक ठरत आहे. विशेष म्हणजे महिला वर्गाला अधिकच संकोच होतो. एटीएममधील बॅटºयाही सुरक्षित नसतील तर पैशांचे काय, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत असून एटीएमच्या सुरक्षिततेकडे बँकांनी लक्ष पुरविण्याची मागणीही होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड