शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

जीवे मारण्याची आणि अतिप्रसंग करण्याची धमकी देत दहा लाखांचा ऐवज लुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 7:25 PM

घरात शिरलेल्या चोरट्यांनी महिलेला जीवे मारण्याची आणि मुलीवर अतिप्रसंग करण्याची धमकी देत दहा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना पिंपरीतील काळेवाडी येथे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. 

पिंपरी : घरात शिरलेल्या चोरट्यांनी महिलेला जीवे मारण्याची आणि मुलीवर अतिप्रसंग करण्याची धमकी देत दहा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना पिंपरीतील काळेवाडी येथे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. 

 गुडीया शफीक शेख (वय ३५, रा. समता कॉलनी, ज्योतिबानगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेख या सोमवारी पहाटे चारच्या सुमारास नळावर पाणी भरत असताना अनोळखी चार जण त्यांच्या घरात शिरले. ‘तुमच्याकडे जेवढे सोने, पैसे असतील ते आम्हाला काढून द्या, नाहीतर तुला मारुन टाकीन व मुलीवर अतिप्रसंग करीन’ अशी धमकी दिली. त्यावेळी आरोपींपैकी एकाने चाकूचा धाक दाखवून पैसे व सोने नाही दिले तर मुलाला मारुन टाकीन अशी  फिर्यादीला धमकी दिली. दरम्यान, दुसरया आरोपीने फिर्यादी महिलेच्या तोंडावर हात धरुन ‘तु जर ओरडली तर तुला देखील मारुन टाकीन’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीने कपाटातील ८ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १ लाख २५ हजार रुपयांची रोकड काढून दिल्यानंतर आरोपी दहा लाखांचा ऐवज घेवून तेथून पसार झाले. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार