शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election : चिन्ह तर मिळाले तर प्रचाराला वेळ कमी,वडगावला अपक्षांची मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचविण्यासाठी धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 13:42 IST

- अपक्षांमुळे निवडणुकीतील चुरस वाढली, मतदान नजीक येऊ लागल्याने प्रचाराने वातावरणही तापले, स्थानिक समस्यांचा मुद्दा प्रचारात पेटला, अपक्ष उमेदवारांकडून जोरदार प्रचार, कार्यकर्तेही लागले कामाला

 - सुदेश गिरमे वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ११ अपक्ष उमेदवार असून अपक्षांना दिनांक २६ नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह मिळाल्याने मतदारापर्यंत चिन्ह पोहोचवण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजपचा एक उमेदवार आहे.

नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार अबोली मयूर ढोरे यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीच्या नवोदित उमेदवार ॲड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तर वंचित बहुजन विकास आघाडीच्या वैशाली पवन उदागे, अपक्ष उमेदवार नाजमाबी अल्ताफ शेख याही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अपक्षांना चिन्ह मिळाल्यानंतर प्रचारासाठी अवघे चार दिवस शिल्लक असल्याने चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांची पळापळ सुरू झाल्याचे चित्र आहे. शिवाय अपक्षांचे कार्यकर्तेही जोरदार प्रचार करत आहेत.वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ४ तर १७ प्रभागात ४५ नगरसेवक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. भाजपचे १७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १६, उद्धव सेना गट १ यासह ११ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी ७ अपक्ष उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असून प्रभाग २ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिंदेसेना यांच्या दुरंगी लढत आहेत. प्रभाग २ मध्येही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दुरंगी लढत आहे.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये तिरंगी लढत असून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व उद्धव सेना गट अशी तिरंगी लढत आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये दुरंगी लढत असून प्रभाग क्रमांक ५ मध्ये रूपाली अतुल ढोरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तेथे राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी लढत आहे. प्रभाग ६ मध्ये राष्ट्रवादी व भाजप अशी लढत आहे, प्रभाग ७ मध्ये राष्ट्रवादी व भाजप याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार चंद्रजीत दिनकर वाघमारे यांच्या अपक्ष उमेदवारामुळे येथी तिरंगी लढत आहे. 

कुठे दुरंगी, तर कुठे तिरंगी लढतप्रभाग ९ मध्ये भाजप व राष्ट्रवादी दुरंगी लढत आहे, प्रभाग ९ मध्ये भाजप व भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार सारिका प्रशांत चव्हाण अशी दुरंगी लढत असून येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार उभा केलेला नाही. प्रभाग १० मध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशी दुरंगी लढत आहे, प्रभाग ११ मध्ये भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस दुरंगी लढत आहे, प्रभाग १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी दुरंगी लढत आहे, प्रभाग १३ मध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस याचबरोबर अपक्ष उमेदवार गणेश दत्तात्रय भागरे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. प्रभाग १४ मध्ये भाजप व राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत आहे. प्रभाग १५ मध्ये राष्ट्रवादी व भाजप अशी दुरंगी लढत आहे, प्रभाग १६ मध्ये राष्ट्रवादी, भाजप याचबरोबर अपक्ष उमेदवार सायली रुपेश म्हाळसकर निवडणूक रिंगणात उतरल्याने तिरंगी लढत आहे. प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादी व भाजप दुरंगी लढत आहे. घराणेशाही, गावकी-भावकीत चुरस

प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपचे दिनेश गोविंद ढोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण विठ्ठल ढोरे यांच्यात अतितटीची लढत आहे, प्रभाग क्रमांक ६ मध्ये माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे व माजी उपसरपंच विशाल वहिले यांच्यात अतीतटीचा सामना आहे. प्रभाग ११ मध्ये माजी नगरसेवक किरण रघुनाथ म्हाळसकर व माजी नगरसेवक सुनील गणेश ढोरे यांच्यात चुरशीची लढत आहे. एकंदरीत सर्वच उमेदवार घराणेशाही, गावकी-भावकीतील असल्याने निवडणुकीच्या प्रचारात रंगतदार आली आहे.

प्रलंबित प्रश्न आणि प्रचारातील मुद्दे

- शुद्ध पाण्याचे पाणी

- शहरातील बाजारपेठेत नित्याचीच होणारी वाहतूक कोंडी.- रेल्वे रुळापलीकडे राहणाऱ्या केशवनगरमधील रहिवाशांना रेल्वे पूल नसल्याने रेल्वे गेटवर तासन्तास थांबावे लागते.

- अनेक वस्त्यांना जोडणारे अरुंद रस्ते अरुंद- शहरातील खेळाडूंसाठी मोठी क्रीडा संकुल होणे गरजेचे

- ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नाहीत

English
हिंदी सारांश
Web Title : Vadgaon Local Body Elections: Independents Rush to Reach Voters with Symbols

Web Summary : With limited time after symbol allocation, independent candidates in Vadgaon are scrambling to connect with voters. Close contests are seen between NCP, BJP, and Shiv Sena factions across wards, intensifying the local election atmosphere.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक