पिंपरी : मोशी येथे प्रियकरासोबत राहणाऱ्या पन्नास वर्षीय महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बंद खोलीत आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. प्राथमिक तपासात हा रिलेशनशिप मधून झालेल्या खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले असून तो महिलेच्या पतीने केला असल्याचे समोर आले आहे. शारदा महेश पटेल (वय ५० ) असे मृत महिलेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी नागेश्वर कॉलनीतील ती राहत असलेल्या खोलीतून शनिवारी सकाळी दुर्गंंधी येऊ लागल्यामुळे शेजारच्या नागरिकांनी याबद्दल पोलिसांना कळविले. पोलिसांनी दरवाजा उघडुन पाहिले असता महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचे तिच्या चिंचवड येथे राहणाऱ्या पतीबरोबर भांडण झाले होते. ती महिला दुसऱ्या पुरुषाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येथे राहत असल्याची चर्चा आहे. आपली पत्नी दुसऱ्या बरोबर राहते याचा राग आल्याने तिच्या पतीने फावड्याने मारून तिला गंभीर जखमी केले. त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे या गुन्ह्याचा अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहे.
मोशीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:39 IST
मोशी नागेश्वर कॉलनीतील ती राहत असलेल्या खोलीतून शनिवारी सकाळी दुर्गंंधी येऊ लागल्यामुळे शेजारच्या नागरिकांनी याबद्दल पोलिसांना कळविले.
मोशीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळला
ठळक मुद्दे महिलेचे तिच्या चिंचवड येथे राहणाऱ्या पतीबरोबर भांडण झाले होते.