शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; पिंपरी-चिंचवडला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

By विश्वास मोरे | Updated: May 29, 2023 18:27 IST

सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरीवर हजेरी लावली

पिंपरी: सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटात पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हजेरी लावली. शहरवासीयांना झोडपून काढले. 

गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील वातावरणात बदल झालेला असून उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे उकाडा जाणवत होता. आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी बारानंतर आकाशामध्ये ढग घ्यायला सुरुवात झाली आणि सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी पडायला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरीवर हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शहरवासींना झोडपून काढले. सोसाट्याच्या वारा आणि विजांचा कडकडाट सुरू होता.  तारांबळ उडाली

शहरातील दापोडी, पिंपरी, चिंचवड, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, थेरगाव, पुनावळे, किवळे, चिंचवड वाल्हेकरवाडी, चिंचवडस्टेशन, संत तुकारामनगर, नेहरूनगर, संभाजीनगर, चिखली, मोशी, भोसरी रावेत अशा विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली होती. झाडांच्या फांद्या पडल्या 

शहर परिसरामध्ये सायंकाळी सव्वा पाच वाजल्यापासून तर सातवाजेपर्यंत विविध भागांमध्ये पाऊस पडत होता. सहाच्या सुमारास पिंपरी परिसरामध्ये जोरदार पाऊस आला. तसेच वाऱ्यामुळे अनेक भागातील झाडांच्या फांद्या पडल्या कोसळल्या. 

चिंचवड परिसरातील वीजपुरवठा खंडित 

जोरदार पाऊस आणि जोरदार वारा येत असल्याने चिंचवड परिसरातील वीजपुरवठा सायंकाळी सातच्या सुमारास खंडित झाला होता. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरीकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीTemperatureतापमानSocialसामाजिक