पतीला साेडून माझ्यासाेबत रहा ; विवाहितेला ‘भाई’ची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 11:49 IST2019-12-22T11:43:37+5:302019-12-22T11:49:35+5:30

पतीला साेडून माझ्यासाेबत रहा असे म्हणत महिलेला मारहाण करणाऱ्या ‘भाई’ला पाेलिसांनी अटक केली आहे.

leave your husband and stay with me ; threat of gunda to women | पतीला साेडून माझ्यासाेबत रहा ; विवाहितेला ‘भाई’ची धमकी

पतीला साेडून माझ्यासाेबत रहा ; विवाहितेला ‘भाई’ची धमकी

पिंपरी : पतीला सोडून माझ्यासोबत रहा, आपण लग्न करू, से सांगून महिलेला मारहाण केली. ‘’मी ईथला भाई आहे,’’ असे बोलून हातात चाकू घेऊन तिच्या पतीच्या अंगावर धावून जात धमकी दिली. पिंपळे गुरव येथे गुरुवारी (दि. 18) हा प्रकार घडला. आरोपी दोन वर्षांपासून पीडितेचा पाठलाग करीत असून, याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इसाक उर्फ गुड्ड्या रज्जाक शेख (रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शेख याने वेळावेळी फिर्यादी महिलेचा पाठलाग केला. पतीला सोडून तू माझ्यासोबत रहा, आपण लग्न करू, असे म्हणाला. त्यास महिलेने नकार दिला. त्यानंतर फिर्यादी महिला गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबलेल्या असताना आरोपी तेथे आला. त्यावेळी हातामध्ये चाकू घेऊन महिलेच्या पतीच्या अंगावर धावून गेला. ‘’मी ईथला भाई आहे,’’ असे बोलून शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेला लाथ मारली. तसेच चापट मारून त्यांच्या कानाला जखम केली. त्यानंतर एका फ्लॅटच्या दरवाजावर लाथा मारून कडी तोडून नुकसान केले. फिर्यादीच्या पतीस फोन करून शिवीगाळ करून धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
 

 

Web Title: leave your husband and stay with me ; threat of gunda to women