शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सात वर्षाच्या बालकाची सुटका, साठ  लाखाच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 23:35 IST

पूर्णानगर येथील साईनिवास हौसिंग सोसायटीजवळ खेळणाºया ओम या सात वर्षाच्या बालकाला अज्ञात अपहरकर्त्यांनी शनिवारी पळवून नेले होते.

पिंपरी : पूर्णानगर येथील साईनिवास हौसिंग सोसायटीजवळ खेळणाºया ओम या सात वर्षाच्या बालकाला अज्ञात अपहरकर्त्यांनी शनिवारी पळवून नेले होते. घराजवळून नेलेल्या ओमला अपहरणकर्त्याच्या तावडीतून पोलिसांनी सोमवारी सुखरूप परत आणले. तब्बल ७२ तासांनी पोलिसांनी अथक प्रयत्नाने ओमला त्याच्या कुटूंबियांच्या ताब्यात दिले. ओमला सुखरूप ताब्यात दिल्यानंतर नातेवाईकांनी समाधान व्यकत केले. साठ लाखाच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण करण्यात आले होते.  एका ठिकाणी ओमला सोडून अपहरणकर्ते निघून गेले असल्याने ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पूर्णानगर परिसरातून अपहरणकर्त्यांनी ओम ला पळवून नेले. मोबाईलवर त्याच्या वडिलांशी संपर्क साधला. साठ लाख रूपयाच्या खंडणीची त्यांच्याकडे मागणी केली. पोलिसांना माहिती दिल्यास मुलाचे बरेवाईट केले जाईल. असे ओमचे वडिल संदीप खरात यांना धमकावले. ओम चे शनिवारी अपहरण झाल्यानंतर खरात कुटुंबिय हवालदिल झाले. चिंताग्रस्त झालेल्या खरात कुटूंबियांनी खंबीरपणे निर्णय घेऊन पोलिसांकडे धाव घेतली. निगडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने ओमचा शोध घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, तसेच निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय पळसुले यांनी गुन्हे शाखा पोलीस पथकाच्या साह्याने ओम च्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले.

अपहरणकर्त्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तपास यंत्रणेत त्रुटी राहिल्यास ओमच्या जिवाला धोका होऊ शकतो. हे लक्षात घेऊन विशेष खबरदारी घेऊन रात्रंदिवस ओम साठी शोध मोहिम राबवली. मोबाईल लोकेशन ट्रेस करीत त्यांनी अपहरणकर्त्यांचा मागोवा घेतला. ओम सुखरूप असल्याची खात्री केली. अत्यंत शिताफिने पोलिसांनी ओमची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्याच्या कुटुबियांनी त्यांचे आभार मानले. 

मुलाचा पुर्नजन्म

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका करण्यासाठी पोलिसांनी अथक परिश्रम घेतले, हे मी स्वत: अनुभवले. त्यांच्यामुळे माझ्या मुलाचा पुर्नजन्म झाला आहे. आहोरात्र एक करून त्यांनी ओमची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. त्यामुळे पुणे पोलिसांचे आम्ही आभार मानतो. 

मुलगा सुखरूप आणणे हेच प्राधान्य 

पोलीस पथकाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलगा सुखरूप कसा आणता येईल. याला प्रथम प्राधान्य दिले. ओमची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी चारशे पोलिसांचे पथक  दिवसरात्र काम करीत होते. साठ लाखांच्या खंडणीची मागणी केली असतानाही एक रूपयासुद्धा अपहरणकर्त्यांना न देता, बालकाची सुटका केली. लवकरच आरोपींनाही अटक केली जाईल. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 

-रश्मी शुक्ला 

पुणे पोलीस आयुक्त

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस