शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वीस लाखांच्या खंडणीसाठी पाणीपुरी विक्रेत्या मुलाचे अपहरण; सहा तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 09:06 IST

मुलाची सुटका करून पोलिसांनी आरोपींकडून हत्यारासह १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पिंपरी : टोळक्याने अल्पवयीन मुलाचे हिंजवडी येथून अपहरण केले. तसेच २० लाखांची खंडणी मागितली. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तपासचक्रे फिरवली आणि सहा तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मुलाची सुटका करून पोलिसांनी आरोपींकडून हत्यारासह १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सनी शंकर कश्यप (वय १५, रा. हिंजवडी) असे सुटका करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. लक्ष्मण नथुजी डोंगरे (वय २२), ज्ञानेश्वर सचिन चव्हाण (वय २२), लखन किसन चव्हाण (वय २६, तिघे रा. अश्वीनीपूर तांडा, गाव वरूड, जि . यवतमाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच विधीसंघर्षीत असलेल्या दोन मुलांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी हा शनिवारी रात्री नऊच्या सुमारास पाणीपुरीची हातगाडी घेऊन घराकडे निघाला होता. त्यावेळी आरोपींनी त्याचे एका चारचाकी वाहनातून अपहरण केले. त्यानंतर सनी याचे वडील शंकर कश्यप यांना फोन करून २० लाख रूपयांची मागणी केली. पैसे नाही दिले तर तुमच्या मुलाला मारून टाकू, अशी धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने तपास सुरू केला. दरम्यान तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी मुलाला घेऊन अहमदनगर रस्त्याने जात असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांचा शोध घेत असताना शिक्रापूर जवळील मलठण फाट्यावर आरोपींची गाडी दिसली. पोलिसांनी आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. तसेच सनीची सुटका केली. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सुनील दहिफळे, सोन्याबापु देशमुख, सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, तुकाराम खडके, रमेश पवार, कर्मचारी महेश वायबसे, बंडु मारणे, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, कल्पेश बाबर, अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत, अमित जगताप यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकKidnappingअपहरण