शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला पळवून नेणाऱ्या मित्राचे अपहरण; गळा आवळून केला खून, पिंपरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 16:13 IST

पुरावा नष्ट करण्यासाठी मृत व्यक्तीचे कपडे काढून मृतदेह पोत्यात बांधून मुळा नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा धक्कदायक प्रकार समोर

ठळक मुद्देअपहरण करून मुळा नदीच्या पात्राजवळ वाकड येथे असलेल्या एका भंगाराच्या दुकानात आणून धीरज यांना मारहाण केली होती.

पिंपरी: प्रेयसीला पळवून नेणाऱ्या मित्राचा पत्ता माहीत करून घेण्यासाठी चार जणांनी मिळून एका व्यक्तीचे अपहरण केले. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृत व्यक्तीचे कपडे काढून मृतदेह पोत्यात बांधून मुळा नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ३१ जुलै २०१९ ला कोन्हे फाटा ता. मावळ येथे घडली.

धीरज मायराम नागर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुरज उर्फ सोन्या अरविंद जगताप (वय ३५, रा. गांधी नगर झोपडपट्टी देहूरोड), अरिफ सिद्दीक शेख (वय ३२, रा. पडवळ नगर, थेरगाव), सागर सुरेश जगताप (वय ३०, रा. थेरगाव), चेतक नेपाळी (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिफ शेख याच्या प्रेयसीला धीरज यांचा मित्र दुर्गा साळवी याने पळवून नेले. या कारणावरून आरोपींनी आपसात संगणमत करून दुर्गा साळवी याचा मुंबई येथील पत्ता माहिती करून घेण्यासाठी धीरज याचे ३१ जुलै २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता कान्हेगाव रेल्वे स्टेशन समोरून अपहरण केले. त्यानंतर मुळा नदीच्या पात्राजवळ वाकड येथे असलेल्या एका भंगाराच्या दुकानात आणून धीरज यांना मारहाण केली.

सुरज याने धीरज यांचे पाय पकडले. सागर आणि चेतक यांनी हात पकडले. त्यानंतर सुरज याने धीरजचा गळा आवळून खून केला. धीरजची ओळख पटू नये यासाठी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे सर्व कपडे काढून मृतदेह एका पोत्यात घालून पोत्याचे तोंड बंद न करता मुळा नदीच्या पात्रात वाकड येथे टाकून दिले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी सुरज जगताप याला ताब्यात घेतले आहे. हा गुन्हा सांगवी पोलिसांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू