नात्याला काळीमा; घटनांमध्ये वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 05:49 AM2017-11-13T05:49:47+5:302017-11-13T05:50:15+5:30

पित्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना भोसरीत घडली आहे. या नराधम पित्याने स्वत:च्या १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांत नात्याला काळीमा फासणार्‍या घटनांत वाढ झाली आहे. 

Kalima Increase in situations | नात्याला काळीमा; घटनांमध्ये वाढ 

नात्याला काळीमा; घटनांमध्ये वाढ 

Next
ठळक मुद्देनातेवाईक, शिक्षकांकडूनच होतेय शोषण धमकावून गैरवर्तन; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कधी पित्याकडून पोटच्या मुलीवर अत्याचार केला जातो. तर कधी जवळच्या नातेवाइकांकडून, शाळेच्या शिक्षकांकडून व आश्रम शाळेतील काळजीवाहू व्यक्तींकडून लैंगिक शोषण होते. पित्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना भोसरीत घडली आहे. या नराधम पित्याने स्वत:च्या १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांत नात्याला काळीमा फासणार्‍या घटनांत वाढ झाली आहे. 
नववीत शिकणार्‍या या मुलीवर तिचे वडील मागील एक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करीत होते. घरात कोणी नसताना वडील तिच्यावर बळजबरी करायचे. अखेर मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने मुलीसह भोसरी पोलीस ठाणे गाठले. तेथे नराधम पित्याविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना अगदी अलीकडची आहे. गेल्या महिन्यात दापोडी येथील अनाथाश्रमात ११ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाले. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असताना, याप्रकरणी आश्रमाच्या संचालकांनी पोलिसांकडे धाव घेतली नाही. उलट प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्याआगोदर वल्लभनगर येथील महानगरपालिकेच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय या मराठी माध्यमाच्या शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला . २0१५ ते २0१७  या दोन वर्षांच्या कालावधित या शिक्षकाने अनेक विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळा सोडल्याचा दाखला हातात देईन, असे धमकावून तो विद्यार्थिनींशी गैरवर्तन करीत असे.

अमानुष अत्याचार
वाकड येथील एका सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनीच पाच वर्षांच्या चिमुरडीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी शहरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.  वडिलांनीच आपल्या दोन सावत्र मुलींवर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सांगवीत काही महिन्यांपूर्वी घडली आहे. केवळ सावत्र मुलीच नाही तर, पत्नीच्या बहिणीच्या नऊ वर्षांच्या मुलीवरसुद्धा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला होता. 

वडिलांनी पोटच्या मुलीवर अत्याचार करणे, शिक्षकानेच विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणे अशा प्रकारच्या नात्याला काळीमा फासणार्‍या घटना घडत आहेत. या घटना घडतात, त्यामध्ये विकृत मनोवृत्तीच्या लोकांचा सहभाग असतो. विकृतीतून या घटना घडत असल्या, तरी आजूबाजूच्या लोकांनी अशा विकृत लोकांवर वेळीच नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ या उक्तीप्रमाणे नागरिकांनी सामाजिक भान जपले पाहिजे. एखाद्याच्या घरात काही वेगळेच सुरू आहे. त्याकडे आजूबाजूच्या लोकांनी दुर्लक्ष न करता त्यात लक्ष दिले पाहिजे. असे प्रकार वेळीच रोखण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. सर्वांनी सजगता दाखविली पाहिजे. सामाजिक भान दाखविल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकेल.    
- गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन.
-

Web Title: Kalima Increase in situations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा