लोणावळ्यात चोरटे मुद्देमालासह जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:08 IST2018-10-05T00:08:29+5:302018-10-05T00:08:33+5:30

अटक : शहर पोलिसांची कारवाई

Junked with a serious matter in Lonavla | लोणावळ्यात चोरटे मुद्देमालासह जेरबंद

लोणावळ्यात चोरटे मुद्देमालासह जेरबंद

लोणावळा : नांगरगाव औद्योगिक वसाहतीमधील अ‍ॅलेक्स ग्राईंडर प्रा. लि. या कंपनीच्या टेरेसवरून १ लाख ७० हजार रुपये किमतीचे अ‍ॅल्युमिनियम धातूचे पार्ट चोरी करणाऱ्या चोरट्यांना लोणावळा शहर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. स्थानिक गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. ३० सप्टेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास कॅलेब व संजय या दोघांनी कंपनीच्या टेरेसवरून अ‍ॅल्युमिनियमचे जॉब कंपनीच्या सुरक्षा भिंतीच्या बाहेर टाकून ते विकण्याकरिता चोरले होते. या प्रकरणी कंपनीचे प्रकाश हेडगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सांगळे, पोलीस नाईक श्रीशैल कंटोळी, वैभव सुरवसे, जयराज देवकर, प्रशांत खुटेमाटे, राम जगताप यांच्या पथकाने सापळा रचत दोन्ही आरोपींना लोणावळ्यात ताब्यात घेत मुद्देमालासह अटक केली.

पोलीस कोठडी

कॅलेब सुभाष नागावकर (रा. गुरववस्ती, लोणावळा) व संजय वामन धोंदवे (रा. जांभूळ, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Junked with a serious matter in Lonavla