शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: विधानसभेला शिवसेनेत प्रवेश; आता घरवापसी, एकनाथ पवार पुन्हा भाजपात

By विश्वास मोरे | Updated: February 14, 2025 20:06 IST

एकनाथ पवार यांनी विधानसभेच्या पराभवास शिवसेनेचे नेते कारणीभूत आहेत, अशी टीका करत पक्ष सोडणार असल्याचे सांगितले होते

पिंपरी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून शिवसेना (उबाठा) पक्षात गेलेले राज्य संघटक एकनाथ पवार यांनी पुन्हा आज भाजपत प्रवेश केला आहे. नांदेड येथील भाजपाच्या एका विशेष कार्यक्रमात प्रवेश केला आहे. 

विधानसभेत भाजप प्रणित महायुतीचे सरकार आल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर महायुतीमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत. लोहा कंधार मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेतील माजी सत्तारूढ पक्षनेते आणि शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवास शिवसेनेचे नेते कारणीभूत आहेत, अशी टीका पवार यांनी काही महिन्यापूर्वी केली होती व पक्ष सोडणार असल्याचे  सूचित केले होते. 

भोंडवेनंतर पवार यांनी सोडली शिवसेनेची साथ 

चिंचवड विधानसभेत उमेदवारी मिळण्याच्या आशेने राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी शिवबंधन बांधले होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी युटर्न घेतला. 'मी मूळचा राष्ट्रवादीचाच राष्ट्रवादी अजित पवार गटातच आहे, असे जाहीर करून चर्चेला पूर्णविराम दिला होता.  त्यापाठोपाठ शिवसेनेचे राज्य संपर्क नेते पवार यांनी शिवबंधन तोडून पुन्हा भाजप प्रवेश केला आहे.  

नांदेड येथे झाला प्रवेश 

नांदेड येथे पश्चिम महाराष्ट्र विभाग बैठकीदरम्यान विविध नेत्यांनी प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थित होते.  एकनाथ पवार म्हणाले, 'माझा विधानसभेत पराभव कोणामुळे झाला. हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे मी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.'

टॅग्स :PuneपुणेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेMahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा