Jewellers shop blown up by spraying black paint on CCTV cameras | सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा रंग स्प्रे करून फोडले ज्वेलर्सचे दुकान 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा रंग स्प्रे करून फोडले ज्वेलर्सचे दुकान 

ठळक मुद्देयाप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद

पिंपरी : सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर तोडून तसेच कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले. दुकानातून २५ हजार ५०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. नेहरूनगर, पिंपरी येथे शनिवारी (दि. २६) सायंकाळी सात ते रविवारी (दि. २७) पहाटे साडेचार दरम्यान हा प्रकार घडला.

अनिल सुरेशकुमार दुगड (वय ३५, रा. अजमेरा, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे नेहरूनगर येथे संतोषी माता मंदिराच्या समोरच्या बाजूला दुर्गा ज्वेलर्स हे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे ग्रील व शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर कट केल्या. त्याचप्रमाणे शेजारील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमे-यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून कॅमेऱ्याचे नुकसान केले. दुकानातून चोरट्यांनी २५ हजार ५०० रुपयांचे चांदीचे दागिने चोरून नेले.

Web Title: Jewellers shop blown up by spraying black paint on CCTV cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.