शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune | हाॅटेलमध्ये झालेल्या लग्नातून चोरी केलेले २६ लाखांचे दागिने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 17:23 IST

आरोपींवर विविध राज्यांत गुन्हे दाखल...

पिंपरी : हाॅटेलमध्ये झालेल्या लग्न समारंभातून सोन्याचे दागिने व नऊ लाखाची रोकड चोरी केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाने मध्यप्रदेशात १७ दिवस वास्तव्य करून आरोपींबाबत माहिती मिळवली. तसेच आरोपींच्या नातेवाईकांकडे चौकशी करून २६ लाखांचे ५२ तोळ्यांचे दागिने जप्त केले.    

रितीक महेश सिसोदिया (वय २०), वरुण राजकुमार सिसोदिया (वय २३), शालु रगडो धपानी (वय २८), शाम लक्ष्मीनारायण सिसोदिया (वय ३८, सर्व रा. कडीयासांसी, ता. पचोर, जि. राजगढ, मध्यप्रदेश), अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हाॅटेलमध्ये ६ डिसेंबर २०२२ रोजी लग्न सभारंभ झाला. या सभारंभातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व नऊ लाख रोख रक्कम चोरी करून नेली. हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाने या गुन्ह्याचा तपास करीत असताना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. फिर्यादीच्या आईने सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली पर्स अनोळखी व्यक्ती घेऊन जात असल्याचे दिसले. मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील चोरटे अशाप्रकारे लग्नसमारंभात चोरी करू शकतात, अशी माहिती मिळाली. त्यानुसार हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाने मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यात १७ दिवस वास्तव्य करून तपास केला.  हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, तपास पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, बंडू मारणे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापूसाहेब धुमाळ, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, सुभाष गुरव, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.     

आरोपींवर विविध राज्यांत गुन्हे दाखल  

लग्नात चोरी करणारे आरोपी हे राजगड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. तसेच चोरी केलेला काही ऐवज आरोपींच्या घरी असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी चारही आरोपींचा शोध घेतला. परंतु ते राहते घरी मिळून आले नाहीत. आरोपींच्या नातेवाईकांकडे तपास करून चोरीच्या दागिन्यांपैकी २६ लाखांचे ५२ तोळ्यांचे दागिने पोलिसांनी जप्त केले. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध राज्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपींचा व उर्वरीत दागिन्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसGoldसोनंpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMadhya Pradeshमध्य प्रदेश