शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जांबेत गायकवाड बिनविरोध

By admin | Updated: August 24, 2015 02:59 IST

जांबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंकुश गायकवाड यांची, तर उपसरपंचपदी ऋषिकेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. निवड होताच फटाक्यांची आतषबाजी

वाकड : जांबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंकुश गायकवाड यांची, तर उपसरपंचपदी ऋषिकेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. निवड होताच फटाक्यांची आतषबाजी आणि गुलाल उधळीत आनंदोत्सव साजरा झाला. निवडीची घोषणा होताच नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंचांनी सदस्यांसह ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुकाध्यक्ष शंकर मांडेकर, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे, मोरेश्वर भोंडवे, नवनाथ लोखंडे आदी उपस्थित होते. सकाळी अकराच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी केवळ एकेक अर्ज दाखल झाल्याने छाननी करून तो वैध असल्याने एकच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी काकासाहेब शिक्केतोड यांनी अंकुश गायकवाड यांच्या नावाची सरपंच, तर ऋषिकेश गायकवाड यांच्या नावाची उपसरपंच म्हणून घोषणा केली. त्यांना सहायक म्हणून ग्रामसेवक सतीश कालेकर आणि तलाठी संजीव साळवी यांनी काम पाहिले. भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवीत एकूण ९ पैकी ८ जागांवर दणदणीत विजय संपादित केला होता. सलग दोन पंचवार्षिक या पदासाठी होणारी निवड बिनविरोध करण्याची परंपरा गावाने यंदाही कायम ठेवली आहे. सर्वांना समान संधी मिळावी यासाठी अंकुश गायकवाड यांची नियुक्ती ३ वर्षांकरिता, तर ऋषिकेश गायकवाड यांची १० महिन्यांकरिता ही निवड झाली. (वार्ताहर)