शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

खुनाच्या दोन गुन्ह्यांत सात वर्षे फरार आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 7:14 PM

कोयत्याने वार करत तसेच गोळीबार करून दोन खून केलेला आरोपी सात वर्षांपासून फरार होता. चाकण आणि म्हाळुंगे परिसरात त्याने दहशत निर्माण केली होती. त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देपिस्तूल व काडतूस जप्त : गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांची कारवाई

पिंपरी : कोयत्याने वार करत तसेच गोळीबार करून दोन खून केलेला आरोपी सात वर्षांपासून फरार होता. चाकण आणि म्हाळुंगे परिसरात त्याने दहशत निर्माण केली होती. त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

संतोष मधुकर मांजरे (वय २९, मूळ रा. मांजरेवाडी, सध्या रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन खुनाच्या गुन्ह्यात सात वर्षांपासून फरार असलेला आरोपी निगडी येथील ओटास्किम येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी ओटास्किम परिसरात सापळा लावला. आरोपी संतोष मांजरे तेथे एका रिक्षातून आला. तो कोणाच्यातरी प्रतीक्षेत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची झडती घेतली. त्याच्याकडे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संतोष आणि त्याचा साथीदार मंगेश गाडे या दोघांनी मार्च २०१३ मध्ये दत्तात्रय नामदेव घनवट (रा. कोरेगाव खुर्द) यांच्यावर कोयत्याने वार करून खून केला होता. त्यानंतर एका महिन्यानंतर एप्रिल २०१३ मध्ये संतोष, त्याचे साथीदार कैलास जावळे, सागर जावळे यांनी राजकीय वादातून धनंजय वसंत आवटे (रा. कुरकुंडी) यांच्यावर कोयत्याने वार करत तसेच गोळी झाडून निघृणपणे खून केला होता. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये संतोष सात वर्षांपासून फरार होता. त्याने चाकण आणि म्हाळुंगे परिसरात दहशत निर्माण केली होती. पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, दिलीप चौधरी, संपत निकम, संजय पंधरे, शिवानंद स्वामी, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, उषा दळे, विपुल जाधव, आतिष कुडके, शिवाजी मुंडे, अजित सानप, नामदेव राऊत, नामदेव कापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :ArrestअटकMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस