हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 00:18 IST2025-07-29T00:17:10+5:302025-07-29T00:18:40+5:30

हिंजवडी फेज एक येथील ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका २३ वर्षीय अभियंता तरुणाने आत्महत्या केली.

IT engineer commits suicide by jumping from building in Hinjewadi, leaves a note... | हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

पिंपरी : हिंजवडी फेज एक येथील ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका २३ वर्षीय अभियंता तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २८ जुलै) दुपारी घडली. दरम्यान, माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी या अभियंत्याने लिहून ठेवली आहे.

पीयूष अशोक कवडे (वय २३, रा. वाकड, पुणे. मूळ रा. आकाशवाणी जवळ, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या अभियंता तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूषॲटलास कॉपको कंपनीत गेल्या वर्षभरापासून अभियंता पदावर कार्यरत होता. दरम्यान, सोमवारी सकाळी कंपनीच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारून त्याने आयुष्य संपवले.

 घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट सापडली असून, त्यामध्ये कोणताही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी ती वैयक्तिक कारणांमुळे केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: IT engineer commits suicide by jumping from building in Hinjewadi, leaves a note...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.