शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

गतिरोधकांमुळे मिळते अपघाताला निमंत्रण; झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नसल्याने वाहनचालकांची होतेय कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 1:49 AM

आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाºया वाकड-हिंजवडी, डांगे चौक रस्त्यावर अनेक गतिरोधकांची बिकट अवस्था आहे़ जिथे वाहनाला गतीच लागत नाही तरीही करण्यात आलेले गतिरोधक निव्वळ पांढरे हत्ती ठरत आहेत.

वाकड : आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाºया वाकड-हिंजवडी, डांगे चौक रस्त्यावर अनेक गतिरोधकांची बिकट अवस्था आहे़ जिथे वाहनाला गतीच लागत नाही तरीही करण्यात आलेले गतिरोधक निव्वळ पांढरे हत्ती ठरत आहेत़ अती रहदारीच्या या रस्त्यावर असलेल्या रस्त्यावरील गतिरोधकांवर झेब्रा क्रॉसिंग नसल्याने वाहने जंप अपघाताला निमंत्रण मिळत आहे.वाकड राजीव गांधी पुलावरून हिंजवडीकडे जाताना तीव्र उताराच्या वेगाला लगाम लावण्यासाठी पूल संपताच एक गतिरोधक करण्यात आला आहे़ हा गतिरोधक झेब्रा क्रोसिंग नसल्याने दुरून दृष्टी पथास येत नाही. त्यामुळे अनेक वाहने या ठिकाणी जोरात आदळतात़ अनेकदा या समस्येमुळे अपघातही झाले आहेत. मात्र वाहतूक पोलीस संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष अनेकांच्या जिवावर बेतत आहे.याच रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यास रुंदीकरण झालेल्या रस्त्यावरून वाहनाचा वेग आणखीनच वाढतो. मात्र, या वेगाला आवरण्यासाठी बीआरटीने कोणतेही ठोस उपाय केलेले नाहीत. या रस्त्यावर असलेला एकमेव गतिरोधक म्हणजे अपघाताला पर्वणीच, हा गतिरोधक म्हणजे डांबराचा लांबसडक गोळा त्याला कसलेही रंगाचे गोंदण नसल्याने वाहने जोराने आदळतात. केवळ ग्रामस्थांच्या व काही जागरूक चालकांच्या तसेच वाहतूक पोलिसांच्या मागणीची प्रशासनाने काढलेली ही भाबडी समजूत वाटते. वाकड-हिंजवडीचा कायापालट झालेले असताना काही मोठे हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या सोयीसाठी कुठलाही परवाना न घेता वाहतूक नियमांचा विचार न करता मनमानी पद्धतीने गतिरोधक उभारण्याचे काम करण्याच्याही काही घटना या भागात घडल्या़ मात्र वाहतूक पोलिसांनी असे गतिरोधक हटविले.थेरगाव, वाकड, हिंजवडी या परिसरातील अंतर्गत रस्त्यावर अनेक लहान गतिरोधक करण्यात आले आहेत़ जिथे गरज नाही अशा ठिकाणी गतिरोधक करून मोठी डोखेदुखी झाली आहे़ गरज नसलेल्या ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त गतिरोधक झाल्याने विनाकारण त्रास होत आहे़ त्यावरून जाताना वाहन जोरदार आदळते त्याचा धक्काही शरीराला अपायकारक ठरत आहे.नियमांचे उल्लंघन : अद्याप पत्रव्यवहारच सुरूखरे तर वाहतूक नियमांच्या अधीन गतिरोधक उभारण्यासाठी वाहतूक पोलीस गरज असलेल्या ठिकाणचा नकाशा काढून कागदोपत्री त्याची गरज कशी आहे, हे दाखवून संबंधित महापालिका किंवा एमआयडीसी, ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करते. त्यानुसार साडेचार फूट रुंद आणि सहा इंच उंचीचा गतिरोधक उभारण्यातयेतो. मात्र, अनेक ठिकाणी या नियम डावलले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत.गतिरोधक करण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते़ आमच्या मागणीनुसार किंवा आमच्या पत्रव्यवहारानुसार गतिरोधक केला जातो़ मात्र, अलीकडे फायद्यासाठी अनेक जण बेकायदा गतिरोधक उभारतात, असे बेकायदेशीर गतिरोधक आम्ही स्वखर्चाने हटवितो़- दत्तात्रेय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग

टॅग्स :Accidentअपघात