शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

प्रशासकीय राजवटीत पिंपरीवर झाला अन्याय; चिंचवडमध्ये जास्त कामे तर सर्वांधिक खर्चाची कामे भोसरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 09:15 IST

लोकसभा निवडणुकीच्या काळातही मोठ्या खर्चाच्या निविदा काढण्यात आल्या.  

पिंपरी : महापालिका मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. या कालावधीत महापालिका हद्दीत विविध विकासकामांवर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांत २,९३४ कोटी १३ लाख ९४ हजार ४३२ रुपये खर्च केले आहेत. या कामात शहरातील विकासकामांचा असमतोल साधला गेला आहे. सर्वांत जास्त कामे चिंचवडमध्ये, तर सर्वांत कमी कामे पिंपरीत झाली आहेत. मात्र, सर्वाधिक खर्चाची कामे भोसरी विधानसभा मतदारसंघात झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.महापालिकेतील राजकीय पदाधिकाऱ्यांचा कालावधी १२ मार्च २०२२ ला संपुष्टात आल्यानंतर प्रशासकीय कालावधी सुरू झाला. प्रशासकीय राजवटीतील तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी फक्त देखरेख व नियोजित कामेच सुरू ठेवली होती. मात्र, त्यांच्या जागी आलेल्या आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील मोठ्या प्रकल्पांना हिरवा कंदील देत कोट्यवधी रुपयांची निविदा काढल्या. त्यामुळे शहरात तब्बल तीन हजार कोटींचा निधी खर्च होत आहे.दरम्यान, शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील एकत्रित कामांवर महापालिकेने ६३ कोटी १६ लाख ६६ हजार १५४ रुपये खर्च केले आहेत. क्रीडा आणि उद्यानविषयक कामांमध्ये ११३ कोटी २५ लाख १ हजार ७३६ रुपये खर्च झाले आहेत.निविदांची कोटींच्या कोटी उड्डाणेमहापालिकेकडून नदी सुधार योजनेत मुळा नदीच्या पहिल्या टप्प्यासाठी ३२१ कोटींची निविदा काढण्यात आली. चिंचवडच्या ऑटो क्लस्टरसमोर १८ मजली प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी २८६ कोटी, शहरातील १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते यांत्रिक पद्धतीने साफसफाईसाठी ६४७ कोटींची, तर भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी जॅकवेल व पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी १५१ कोटींची निविदा काढण्यात आली. अर्बन स्ट्रीटच्या कामालाही परवानगी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातही मोठ्या खर्चाच्या निविदा काढण्यात आल्या.   विधानसभा मतदारसंघांनुसार केलेली कामे (कंसात निविदांची संख्या) 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाMahayutiमहायुतीMaharashtraमहाराष्ट्र