पवना धरणातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: September 2, 2023 15:36 IST2023-09-02T15:34:16+5:302023-09-02T15:36:57+5:30
त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे...

पवना धरणातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी : पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून १४०० क्यूसेक्सने विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरण शंभर टक्के क्षमतेने भरलेले आहे. विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी सकाळी ९.३० वाजता ८०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. हा विसर्ग १२ वाजता वाढवून ८०० क्यूसेक्स वरून १४०० क्यूसेक्स करण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता कधीही पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
पवना नदी काठच्या सर्व नागरीकांनी सतर्क रहावे. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने केले आहे.