Pimpri Chinchwad: सतत कामे सांगतो म्हणत कंपनी मॅनेजरवर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

By प्रकाश गायकर | Published: March 20, 2024 05:45 PM2024-03-20T17:45:09+5:302024-03-20T17:46:44+5:30

पिंपरी : सतत कामे सांगतो म्हणत कंपनी मॅनेजरवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि.१९) बेबडओहळ, मावळ येथे घडली. ...

In the company, the manager said work, the worker broke his head | Pimpri Chinchwad: सतत कामे सांगतो म्हणत कंपनी मॅनेजरवर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad: सतत कामे सांगतो म्हणत कंपनी मॅनेजरवर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

पिंपरी : सतत कामे सांगतो म्हणत कंपनी मॅनेजरवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि.१९) बेबडओहळ, मावळ येथे घडली. याप्रकरणी किरण मानसिंग भोसले (वय ४७ रा.मावळ) यांनी शिरगाव परंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कुमार ओझरकर (२५ रा.शिवणे, मावळ) व एक अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सुधिर मच्छिंद्र अडसूळ (४७) हे गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी कुमार हा मानेग्रो कंपनीत काम करतो. तेथेच अडसूळ हे मॅनेजर पदावर काम करतात. यावेळी अडसूळ हे कंपनीतील कामे सतत सांगतात, त्याच रागातून कंपनी वरून घरी जात असताना आरोपीने  रागाने स्टील रॉडने डोक्यावर जोरात मारून  गंभीर जखमी केले. त्यात अडसुळ यांची कवटी फ्रॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले.

Web Title: In the company, the manager said work, the worker broke his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.