शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत पोलिसांकडून बंदोबस्त असतानाही सराईत गुन्हेगाराकडून भरचौकात गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 19:55 IST

हवेत सात ते आठ गोळ्या झाडल्या

पिंपरी : सराईत गुन्हेगारांनी हवेत गोळीबार केला. चिंचवड येथील पत्रा शेड तसेच पिंपरी येथील भाट नगर येथे मंगळवारी (दि. ६) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. हवेत सात ते आठ गोळ्या झाडल्या असत्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दापोडी येथील सराईत गुन्हेगार शाहरुख शेख हा त्याच्या दोन साथीदारांसह एका रिक्षातून चिंचवड येथील पत्रा शेड येथे आला. तेथे त्याने हवेत गोळीबार केला. त्यानंतर भाट नगर येथे रिक्षातून येऊन हवेत दोन गोळ्या झाडल्या. तत्पूर्वी येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यासाठी त्याने एकाला पिस्तुलाचा दाखविला. तसेच एका जणांकडे मोबाईल हिसकावला. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही घटनास्थळी पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेज वरून आरोपींचा शोध सुरू आहे. 

दिवसभर बंदोबस्त असतानाही गोळीबार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात ठीक ठिकाणी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असे असतानाही भर दिवसा गोळीबाराची घटना घडली. तसेच गेल्या आठवड्यात चिंचवड येथे एकावर कोयत्याने वार करून खून केला. त्यावेळी आरोपींनी दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केला होता. गोळीबाराच्या या घटनांनी शहरातील सामान्य नागरिक दहशतीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकSocialसामाजिक