शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षात ओढून महिला पोलिसाचा विनयभंग; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:45 IST

रात्री सव्वानऊच्या सुमारासची घटना

पिंपरी : रिक्षा व्यवस्थित चालविण्यास सांगितल्याने महिला पोलिसासोबत गैरवर्तन केले. रिक्षात ओढून विनयभंग केला. याप्रकरणी रिक्षाचालकासह तिघांना अटक केली. भारतमाता चौक, मोशी येथे मंगळवारी (दि. २२) रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली. 

विश्वदीप भरत मादलापुरे (वय १९), अभिषेक बाळासाहेब पोळ (वय १९), सुनील शिवाजी कसबे (वय २०, तिघे रा. बनकरवस्ती, मोशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस कर्मचारी असलेल्या पीडित महिलेने याप्रकरणी बुधवारी (दि. २३) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील रिक्षा वेडीवाकडी आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा रीतीने चालवली. त्यामुळे फिर्यादीने आरोपींना रिक्षा व्यवस्थित चालवण्यास सांगितले. पोलीस कर्मचारी असलेल्या फिर्यादी महिलेचे न ऐकता आरोपी पुढे निघून गेले.

त्यानंतर भारतमाता चौकात सिग्नलवर रिक्षा थांबली असता फिर्यादी महिला पोलीस तेथे पोहचल्या. मी पोलीस आहे. रिक्षा व्यवस्थित चालवा, असे फिर्यादीने सांगितले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीसोबत गैरवर्तन करून फिर्यादीचा विनयभंग केला. तसेच फिर्यादीला रिक्षात ओढून रिक्षा तशीच पुढे पळवून नेली, असे फिर्यादीत नमूद आहे. सरकारी कामात अडथळा आणून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना अटक केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीmoshiमोशीbhosariभोसरीPoliceपोलिस