पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी राहणार शहराचा पाणीपुरवठा बंद
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: May 27, 2024 17:26 IST2024-05-27T17:25:35+5:302024-05-27T17:26:34+5:30
शहरातील विविध ठिकाणाच्या जलवाहिनीतील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत...

पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी राहणार शहराचा पाणीपुरवठा बंद
पिंपरी : निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील विविध ठिकाणाच्या जलवाहिनीतील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.३०) पिंपरी चिंचवड शहराचा नियमित असणारा सकाळ व संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.
त्याचबरोबर शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी शुक्रवारी(दि.३१) होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.