शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘पोलिसांत तक्रार केली तर तुझा मर्डर करीन’, दारुसाठी तरुणावर कोयत्याने वार

By नारायण बडगुजर | Updated: December 24, 2023 16:51 IST

चिंचवड येथील लिंकरस्त्यावरील पत्राशेड समोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली

पिंपरी : दारुला पैसे दे, असे म्हणून चौघांनी मिळून तरुणाच्या डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले. तसेच लोकांमध्ये दहशत पसरवली. तू पोलिसांत तक्रार केली तर तुझा मर्डर करीन, अशी धमकीही दिली. चिंचवड येथील लिंकरस्त्यावरील पत्राशेड समोरील मोकळ्या जागेत शुक्रवारी (दि. २२) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. 

प्रमोद वामन ओगले (२७, रा. लिंक रस्ता, पत्रा शेड झोपडपट्टी, चिंचवड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २३) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अमन शेख, आकाश मोरे, आकाश राजू कांबळे, अतुल भोसले (सर्व रा. पत्राशेड, लिंक रस्ता, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद ओगले हे राहत्या घरी जात होते. त्यावेळी संशयित आकाश कांबळे याने ‘‘दारुला पैसे दे,’’ असे म्हणून प्रमोद यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. अमन शेख याने फिर्यादी प्रमोद यांच्या डेक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले. आकाश कांबळे याने स्टीलचा पाईप डोक्यात मारून प्रमोद यांना जखमी केले. त्यावेळी फिर्यादी प्रमोद मदतीसाठी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने पत्राशेडमधील लोक बाहेर आले. त्यावेळी अमन शेख याने  त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. ‘‘कोणी पण इथे येऊ नका, जो कोणी याला मदत करील एकाएकाला मी मारीन, मी अगोदर खूप लोकांना मरले आहे, खूप गुन्हे केले आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी इथला भाई होणार आहे. पूर्ण पिंपरी मला भाई म्हणून ओळखते. माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही,’’ असे म्हणून अमन शेख याने लोकांमध्ये दहशत पसरविली. त्यामुळे लोक घाबरून घरात जाऊन दरवाजे खिडक्या बंद करून बसले. ‘‘तू जर माझी पोलिसांत तक्रार केली तर मी सुटल्यावर तुझा मर्डर करीन,’’ असे म्हणून अमन शेख याने फिर्यादी प्रमोद यांना धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक नीलेश चव्हाण तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकSocialसामाजिक