शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

५६ जागांवर मुख्यमंत्री होऊ शकतो, तर पिंपरीत ५५ जागांवर शिवसेनेचा महापौर का नाही? संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 17:36 IST

स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची ईडीकडे तक्रार करणार

पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे पुणे आणि पिंपरी चिंचवड दौरे वाढले आहे. या दौऱ्यांमध्ये महापालिका निवडणुकांच्या रणनीती ठरविण्याचे प्रयत्न देखील सुरु आहे. सध्या भाजपच्या हातात असणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 

शिवसेना संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आकुर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते.राऊत म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक २०२२ ला होणार आहे. आणि महापालिकांच्या निवडणुकीतील आघाडीबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. महापालिकेत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ५५ नगरसेवक करण्याचे टार्गेट आहे.’’ ५५ जागांवर शिवसेनेचा महापौर होणार का? या प्रश्नावर ‘‘५६ जागांवर मुख्यमंत्री होऊ शकतो, मग ५५ जागांवर पिंपरीत शिवसेनेचा महापौर का नाही असे राऊत म्हणाले. 

औद्योगिकनगरीत गेल्या साडेचार वर्षात भय आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला नाही. याउलट जास्त वाढताना दिसत आहे. भय, भ्रष्टाचारमुक्त ही सगळी ठेकेदारीची रिंग आहे. शहरातील आमदारांसह इथले सगळे प्रमुख लोक महापालिकेतील ठेकेदारीमध्ये गुंतलेत. महापालिकेत जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे. भ्रष्टाराची  प्रकरणे मंत्रालयापर्यंत पोहोचली आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांचे कुटूंबीय संचालक असलेल्या स्मार्ट सिटीतील कंपनीच्या  घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडे  तक्रार करणार आहे, असा आरोप शिवसेना संपर्क प्रमुख आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.  

खासदार राऊत म्हणाले, ‘‘महापालिकेत जनतेच्या पैशांची लूट झाली आहे. भाजपच्या मुंबईत बसलेल्या प्रमुख नेत्यांनी यावर मत व्यक्त केले पाहिजे. दुस-यांवर जसे बोलतात. तसे यावर बोलणे देखील गरजेचे आहे. त्यांना स्वत:वरील टीका सहन होत नाही. ’’..............................राज्य सरकार तपास करीत नाहीराऊत म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटीची कामे घेणा-या कंपनीत कोणाचे कुटुंबीय संचालक आहेत. याबाबतची सगळी कागदपत्रे ईडीला पाठविणार आहोत. असे तपास हल्ली राज्य सरकार करत नाही. ईडी करते. ईडीकडे माहिती नसेल. तर, आम्ही पाठवून देवू, महापालिकेतील प्रकरणे आता बाहेर येत आहे. कोरोना काळात चौकशा केल्या नाहीत. आता प्रकरणे बाहेर येत असून चौकशा केल्या जातील. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यहार जनतेच्या पैशांची लूट सहन करणार नाहीत.’’ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण