‘‘कोणी मध्ये आल्यास मुडदा पाडीन’’; टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार

By नारायण बडगुजर | Updated: January 31, 2024 13:35 IST2024-01-31T13:31:28+5:302024-01-31T13:35:01+5:30

थेरगाव येथील बारणे चाळीत सोमवारी (दि. २९) हा प्रकार घडला...

"If anyone comes in, I will throw a fight"; A young man was stabbed by a gang | ‘‘कोणी मध्ये आल्यास मुडदा पाडीन’’; टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार

‘‘कोणी मध्ये आल्यास मुडदा पाडीन’’; टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी : टोळक्याने कोयत्याने वार करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच काेयता हातात फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. कोणी मध्ये आले तर मुडता पाडीन, अशीही धमकी दिली. थेरगाव येथील बारणे चाळीत सोमवारी (दि. २९) हा प्रकार घडला.

आनंद सुभाष जेवूरकर (२९, रा. हिरामण बारणे चाळ, थेरगाव) यांनी या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आखिल उर्फ आदेश सुधीर बाबर व त्याचे इतर दोन साथीदार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद हे कामावरून येऊन  त्यांच्या मित्रांसोबत हिरामण बारणे चाळीजवळ गप्पा मारत थांबले होते. यावेळी आखिल आणि त्याचे साथीदार हे दुचाकीवरून आले. आखिल हा फिर्यादी आनंद यांच्या ओळखीचा आहे. त्याने व त्याच्या साथीदारांनी आनंदला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आखिलने त्याच्या कंबरेचा कोयता काढून वार केले. यात आनंद गंभीर जखमी झाले. यावेळी आनंद यांनी आरडाओरडा केला. आमच्या आडवे कोणी यायचे नाही. आडवे आलात तर मुडदा पाडीन, असे म्हणून यावेळी आखिल आणि त्याच्या साथीदारांनी हातातील कोयता फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे चाळीतील लोकांनी भीतीपोटी दरवाजे बंद करून घेतले. त्यानंतर आखिल आणि त्याच्या साथीदारांनी तेथून पळ काढला.

Web Title: "If anyone comes in, I will throw a fight"; A young man was stabbed by a gang