शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

मी आवाज नाही स्वर लावते : देवकी पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 3:00 AM

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आरती अंकलीकर यांनी देवकी पंडित यांची मुलाखत घेतली.

पुणे : चुकीच्या आणि रियाजाच्या अतिताणामुळे माझा आवाज गेला वर्षभर बोलू शकले नाही. गळा गाता करण्यासाठी दोन वर्षे लागली. माझा आवाज कुठला आणि तो कसा गेला, हे मला आत्मचिंतनातून उमजले, अशा अनुभवी बोलातून प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांनी सुराला सूर लावला म्हणजे स्वर जुळला असे होत नाही. मी आवाज नाही पण स्वर लावते याकडे लक्ष वेधले.सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये महोत्सवाच्या तिसºया दिवशी आरती अंकलीकर या देवकी पंडित यांची मुलाखत घेणार होत्या; पण प्रत्यक्षात दोघींनी एकमेकांशी गप्पाच मारत श्रोत्यांना सुरेल शब्द मैफिलीचा अनुभव दिला. शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी झालेल्या या कार्यक्रमाला आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, गायक आनंद भाटे उपस्थित होते. लहानपणापासून मैत्रिणी असलेल्या, या दोन्हीही गायिका अगोदर पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आणि पुढे किशोरीताई आमोणकर यांच्याकडे शिकल्या. एकमेकींच्या फिरक्या घेत, पंडित वसंतराव कुलकर्णी आणि किशोरीताई यांच्यासह माणिक वर्मा यांचा साधेपणा, पं. जितेंद्र अभिषेकी, बबनराव हळदणकर, मोगुबाई कुर्डीकर, वीणाताई सहस्रबुद्धे, आशा भासले, लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी अशा अनेक महान गायकांच्या आठवणी दोघींनी उलगडून दाखवल्या. देवकी घरी थालीपीठ खायला येणार असल्याने इथे यायला उशीर झाला असे सुरूवातीलाच आरती अंकलीकर यांनी मिश्किलपणे सांगताच ‘उशीर झाला की माझ्यावर ढकलायचं ही तुझी नेहमीची सवय आहे, अशा लडिवाळ स्वरात देवकी पंडित यांनी प्रत्युत्तर दिले. या वेळी ‘षड्ज’ या कार्यक्रमात ‘जमुना के तीर’ हा अब्दुल करीम खॉँ यांच्यावरील लघुपट दाखविण्यात आला.गायकीचा स्वभावाशी संबंध असतो. राग म्हणून विचार मांडतो. हळुवारपणे उलगडणं म्हणजे गाणं सूर, बंदिश, वादी-संवादी नाही तर त्यापलीकडे जाऊन आपण यमन होणं म्हणजे गाणं असतं. त्यासाठी रियाज, गाणं आहे हे किशोरीताईंनी सांगितले. ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. मी बुवांच्या अंगाखांद्यावर खेळले आहे ‘ही माझी मुलगी आणि शौनक दुसरा’, असेच ते सगळ्यांना सांगायचे. मला परत त्यांनी गाण्यात आणलं. गुरूंनी जे शिकवले ते जपून ठेव असे त्यांनी सांगितले.- देवकी पंडितकिशोरीताई म्हणजे गाणे देणाºया गुरू आहेत. किशोरीतार्इंनी जयपूर घराण्याचे गाणे पचवून त्यातील भावतत्व घेऊन स्वत:चे गाणे, स्वत:चे घराणे निर्माण केले. त्यांचे गाणे आता तीन पिढ्या गायले जात आहे. त्यांनी राग व्हायला आणि दुस-यांनाही राग करायला शिकवले. शरीर, मन, मेंदू, आत्मा यांचा विलक्षण संगम म्हणजे किशोरीताई यांचे गाणे.- आरती अंकलीकर

टॅग्स :musicसंगीत