चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 20:28 IST2019-11-30T20:26:21+5:302019-11-30T20:28:41+5:30

पहिले लग्न होऊनही दुसरे लग्न करणाऱ्या पतीने दुसऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला. ११ मे २०१२ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

husband torture wife to take doubt about her character | चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ

पिंपरी : पहिले लग्न होऊनही दुसरे लग्न करणाऱ्या पतीने दुसऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला. ११ मे २०१२ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.


एका ४४ वर्षीय विवाहितेने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती नझीर अहमद उस्मान वाघू (वय ४९, रा. वृंदावन सोसायटी, जामा मस्जिद शेजारी, खराळवाडी, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नझीरचे पहिले लग्न झाले असून, त्याने पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली आहे, असे सांगून फिर्यादीशी त्याने ११ मे २०१२ रोजी दुसरे लग्न केले. लग्नानंतर २७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत आरोपीने फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार शिवीगाळ, मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

Web Title: husband torture wife to take doubt about her character