शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पत्नीला मेसेज केला म्हणून पतीने केला स्केटिंग प्रशिक्षकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 7:10 PM

स्केटिंगपटू निलेश नाईक याच्या खुनाची उकल करण्यात पाेलिसांना यश आले आहे. पत्नीला मेसेज केल्याच्या रागातून आराेपीने निलेश याचा खुन केला असल्याचे समाेर आले आहे.

पिंपरी : धारदार हत्याराने वार करून स्केटिंग प्रशिक्षकाचा खून करण्यात आल्याप्रकरणी आरोपीला २४ तासांच्या आत पाेलिसांनी जेरबंद केले आहे. बुधवारी (दि. ४) सकाळी नऊच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे येथे खुनाचा हा प्रकार उघडकीस आला होता. पत्नीला मेसेज केला म्हणून आरोपीने स्केटिंग प्रशिक्षकाला दारू पाजून त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल ज्ञानोबा मानमोडे (रा. सूसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. तर निलेश शिवाजी नाईक (वय २४, रा. सूसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे खून झालेल्या स्केटिंग प्रशिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी मयत नीलेश यांचे मामा कपिल भुपाल नाईक (वय ३४, रा. सूसगाव, ता. मुळशी,) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

मयत नीलेश नाईक व आरोपी विठ्ठल मानमोडे हे दोघे एकाच बिल्डींगमध्ये राहत होते. त्यामुळे दोघे एकमेकांना ओळखत होते. स्केटिंगपटू असलेल्या नीलेश याने आरोपी मानमोडे याच्या बायकोला मेसेज केला. त्यामुळे आरोपी मानमोडे याला राग आला. त्यातून चिडून जाऊन त्याने मंगळवारी (दि. ३) रात्री नीलेश याला जांबे येथे मोकळ्या मैदानात घेऊन जाऊन दारू पाजली. त्यानंतर धारदार हत्याराने त्याच्या मानेवर, गळ्यावर व डोक्यात वार करून त्याला जबर जखमी करून त्याचा खून केला. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 

आरोपी मानमोडे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात एक व वडगाव मावळ पोलीस ठाण्यात एक असे दोन गुन्हे दाखल आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे तपास करीत आहेत. 

अशी झाली गुन्ह्याची उकलआरोपी विठ्ठल मानमोडे याच्यासोबत बाहेर जात असल्याचे मयत नीलेश याने त्याचा मामा फिर्यादी कपिल नाईक याला सांगितले होते. तसेच आरोपी मानमोडे हा त्याच्या दुचाकीवरून नीलेश याला जांबे येथील मोकळ्या मैदानात घेऊन गेला. दारू पाजून नीलेश याचा तेथे खून केला. त्यानंतर घटनास्थळी दुचाकी सोडून आरोपी मानमोडे तेथून पसार झाला. त्या दुचाकीमालकाचा शोध घेतला असता मानमोडे याचे नाव समोर आले. मानमोडे याच्याबाबत माहिती घेतली असता तो त्याच्या घरी नसून पसार झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर तांत्रिक तपासावरून तो मुंबईत एका हॉटेलात असल्याचे निष्पन्न झाले. तेथून त्याला जेरबंद करण्यात आले. 

टॅग्स :Murderखूनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसDeathमृत्यू