बायकोच्या शरीरसुखाला विरोध केल्याने साडूकडून नवऱ्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 13:27 IST2019-09-20T21:47:50+5:302019-09-21T13:27:34+5:30

चुलत बहिणीकडे राहायल्या गेलेल्या महिलेकडे चुलत बहिणीच्या नवऱ्याने शरीरसुखाची मागणी केली. हे तिच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर झालेल्या वादात चुलत साडुने तिच्या पतीचा खून केला.

husband murdered by sister's husband because of not giving chance to sex | बायकोच्या शरीरसुखाला विरोध केल्याने साडूकडून नवऱ्याचा खून

बायकोच्या शरीरसुखाला विरोध केल्याने साडूकडून नवऱ्याचा खून

कामशेत : पती व मुलासह महिला तिच्या चुलत बहिणीच्या घरी मुक्कामास गेले. त्या वेळी रात्री दोन्ही साडूभावाचा वाद झाला. या वेळी चुलत बहिणीच्या पतीने घरी राहण्यास आलेल्या साडूचा कोयत्याने वार करून त्याचा खून केला. मावळ तालुक्यातील बुधवडी येथे शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.   
संजय सुदाम वाघमारे (वय २०, रा. काब्रे, ता. मावळ) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी शकून संजय वाघमारे (वय २९, रा. काब्रे) या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजू बबन ठाकर (वय ३५, रा. बुधवडी, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

Web Title: husband murdered by sister's husband because of not giving chance to sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.