The husband is hit by a wife after not giving money to going village | गावी जाण्यासाठी पैसे न दिल्याने पतीला पोळपाटाने मारहाण
गावी जाण्यासाठी पैसे न दिल्याने पतीला पोळपाटाने मारहाण

ठळक मुद्देचिंचवड येथील प्रकार : पतीने मारहाण केल्याची पत्नीचीही तक्रार 

 पिंपरी : गावी जाण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीने पतीच्या डोक्याला फरशीचे पोळपाट मारून मारहाण केली. तसेच भावजयनेही त्याला चावा घेऊन मारहाण केली. चिंचवडच्या विद्यानगरमध्ये गुरुवारी (दि. १८) पहाटे साडेचार वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच खचार्साठी पैसे मागितले म्हणून पतीने मारहाण केल्याची तक्रार पत्नीने केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता नवनाथ तोरणे (वय २६) आणि अनिता संतोष तोरणे (वय २७, दोन्ही रा. विद्यानगर बसथांब्याच्या पाठीमागे, चिंचवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नवनाथ सोपान तोरणे (वय ३४, विद्यानगर बसथांब्याच्या पाठीमागे, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. 
फिर्यादी नवनाथ तोरणे आणि नीता तोरणे पती-पत्नी आहेत. तर अनिता तोरणे नवनाथ तोरणे यांच्या भावजय आहे. नीता यांनी गावी जाण्यासाठी त्यांचे पती नवनाथ यांच्याकडे पैसे मागितले.माझ्याकडे पैसे नाहीत, असे नवनाथ यांनी सांगितले. त्याचा राग मनात धरून नीता हिने नवनाथ यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करीत डोक्यात फरशीच्या पोळपाटाने मारहाण केली. तसेच नवनाथ यांची भावजय अनिता तोरणे हिने देखील नवनाथ यांना शिवीगाळ करून त्यांच्या तोंडास डाव्या ओठाच्या शेजारी आणि डाव्या हाताच्या अंगठ्यास चावा घेऊन जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. 
पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण
यातील दुसऱ्या प्रकरणात पती नवनाथ सोपान तोरणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी महिलेने नवनाथ तोरणे याच्याकडे वाटखचार्साठी पैसे मागितले असता त्यांच्यात वाद झाला. नवनाथ तोरणे याने फियार्दीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीची बहीण अनीता तोरणे आल्या. आरोपी नवनाथ याने त्यांनाही शिवीगाळ करून अंगावर धावून गेला.


Web Title: The husband is hit by a wife after not giving money to going village
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.