चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 18:31 IST2021-04-06T18:30:30+5:302021-04-06T18:31:49+5:30
दिघी येथे राहत्या घरात पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली होती.

चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
पिंपरी : शारीरिक व मानसिक त्रास देऊन तसेच चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला. दिघी येथे रविवारी (दि. ४) ही घटना घडली.
रजत संजय बोर्डे (वय २७, रा. दिघी), असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ५) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची २२ वर्षीय मुलगी तिच्या पतीसोबत दिघी येथे राहत होती. राहत्या घरात गळफास घेऊन तिने आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी (दि. ४) उघडकीस आला. याप्रकरणी तिच्या पतीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे तपास करीत आहेत.