शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी मनसेचा पिंपरी महापालिकेवर हंडा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 17:05 IST

महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

ठळक मुद्देपाणीपुरवठा विभागाने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन एक आठवड्यापासून केले सुरू

पिंपरी : धरण शंभर टक्के भरले असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी मनसेच्या वतीने सोमवारी महापालिका भवनावर मोर्चा काढला होता. त्यामध्ये महिलांनी हंडे, माठ घेऊन सहभाग नोंदविला. महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील पाणी कपात रद्द करावी, अशी मागणीही केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन एक आठवड्यापासून सुरू केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना पत्र दिले होते. त्यानुसार महापालिका भवनासमोर आज दुपारी आंदोलनकरण्यात आले. यावेळी महापालिकेतील गटनेते आणि शहरप्रमुख सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनात हेमंत डांगे, अश्विनीताई बांगर, सिमाताई बेलापुरकर, सुजाता काटे, विशाल मानकरी, अनिता पांचाळ, वैशाली बौराटे, नितिन चव्हाण, अक्षय नाळे, मयूर कांबळे, प्रतिक शिंदे,  विकास कदम, अजय अड़गळे, नारायण पठारे, तेजस दाते, सुजय शिंदे, दीपेन नाईक, नितिन कावळे, अधिकराव पोळ, राजू सावळे, चंद्रकांत दानवले, सुरेश सकट, मयूर चिंचवडे, दत्ता देवतरासे, रूपेश पटेकर, स्वप्निल महंगरे, रोहित काळभोर, संगीता देशमुख, स्नेहल बांगर, श्रद्धा देशमुख आदी उपस्थित होते. त्यानंतर शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना निवेदन दिले.मनसे गटनेते सचिन चिखले म्हणाले, ह्यह्यपिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पाणी पुरेल एवढे मुबलक पाणी पवना धरणामध्ये असताना देखील पाणी कपात करुन पिंपरी-चिंचवडकरांना वेठीस धरण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे. महापालिकेने लादलेल्या पाणी-बाणीचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा पद्धतीने नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे, जे निषेधार्ह आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजननाने पाणी पश्न गंभीर झाला आहे.ह्णह्ण

आंदोलन : पाणी कपातीच्या विरोधात मनसेच्या वतीने सोमवारी महापालिका भवनावर मोर्चा काढला होता. त्यामध्ये महिलांनी हंडे, माठ घेऊन सहभाग नोंदविला. महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीDamधरणMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना