Hotel 'sealed' by police ; action on hucca parlor in Hinjewadi | हिंजवडीत हुक्का पार्लरवर कारवाई; हॉटेल रुड लाउंज पोलिसांनी केले 'सील'

हिंजवडीत हुक्का पार्लरवर कारवाई; हॉटेल रुड लाउंज पोलिसांनी केले 'सील'

पिंपरी : हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करून हिंजवडी पोलिसांनीहॉटेल सीलबंद केले. हिंजवडी येथील हॉटेल रुड लाऊंज या हॉटेलवर शुक्रवारी (दि. १६) ही कारवाई करण्यात आली.

हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील हॉटेल रुड लाऊंज येथे हॉटेल चालकाने हुक्का पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पिण्याचे फ्लेवर तसेच इतर साहित्य उपलब्ध करून देऊन त्याचे हुक्का पार्लर शर्ती पेक्षा जास्त वेळ सुरू ठेवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हॉटेल ३० एप्रिल २०२१ पर्यंत सील करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड सहाय्यक निरीक्षक सागर काटे उपनिरीक्षक रवींद्र मुदळ, पोलीस कर्मचारी योगेश शिंदे, संतोष शिंदे, सचिन सानप, हिंजवडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आतिष साखरे, लक्ष्मण ढवळे, गणेश मांजरे, संतोष तुपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Hotel 'sealed' by police ; action on hucca parlor in Hinjewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.