शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

Hinjawadi Fire Incident : जनार्दनमामा एक दिवस अगोदर म्हणाले होते, 'बघतोच, एकएकेची वाट लावतो'

By विश्वास मोरे | Updated: March 21, 2025 20:11 IST

जनार्दन याला गोवलं जात असल्याचा आरोप त्याची पत्नी आणि भावाने केला

पिंपरी :हिंजवडीतील बस आग घटनेत वेतन न दिल्याने आणि अपमानास्पद वागणूक देत असल्याने चालकानेच हत्याकांड केले. चार कामगाराचा बळी घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर घटनेच्या एक दिवस अगोदर जनार्दनमामा यांनी चिडून 'बघतोच, एकएकेची वाट लावतो!' असे कंपनी कामगारासमोर बोलल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तर चालकाची पत्नी आणि भाऊ यांनी आमच्या माणसास प्रकरणात गोवले जात आहे, अशी मागणी केली आहे. 

हिंजवडी येथे ट्रॅव्हलर बसला आग लागल्याने बुधवारी चार कामगारांचा मृत्यू झाला. तर पाच कामगार जखमी झाले. पाच जण सुखरूप बाहेर पडले होते. अपघात नसून घातपात आहे, असा या प्रकरणाचा उलगडा करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. बस चालकानेच कट रचून कामगारांना ठार मारल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी दत्ता काळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यामुळे चालकावर खून आणि खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला आहे.  आणि येथून मिळाली तपासाला दिशा घटना घडल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. बसमधील सहकाऱ्यांच्या जबाबात त्यात बसमधील सहकारी गुरुवारी विठ्ठल गेनु दिघे (वय ५५, रा.भुगाव), विकास कृष्णराव गोडसे (वय ५३, रा. कोथरुड) यांनी आपबिती सांगितली. 'बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे आम्ही पुणे येथुन व्योमा ग्राफिक्स प्रिंटिंग प्रेस फेज येथे जात होती. त्यावेळी १४ कामगार व चालक जर्नादन हंबर्डीकर असे एकुण १५ जण होते. सह जात होतो. बस विप्रो सर्कल येथुन जात असताना चालक जनार्दन यानी बस थांबवेळी. खाली वाकुन ड्रायव्हर साईटचा उजव्या बाजुचा दरवाजा उघडला. पायाजवळ काहीतरी हालचाल केली आणि  बाजुचा दरवाजा पुन्हा लॉक केला.तेव्हा बसमध्ये उग्र स्वरुपाचा वास आला. परंतु बसमध्ये कोणतेही प्रकारचा स्पार्कचा आवाज झाला नाही. त्यानंतर बस थोडे अंतर पुढे गेल्यानंतर चालकाच्या उजव्या पायाजवळ आग लागुन धुर येउ लागला. त्याचवेळी जर्नादनने बस चालु ठेवुन बसच्या डाव्या दरवाजातुन उडी मारली. त्यावेळी आगीचा भडका उडाला. आम्हीही बसमधुन खाली उडी मारली. बसमधील आमचे सहकारी गुरुदास लोखरे, राजु चव्हाण, शंकर शिंदे, सुभाष भोसले यांना बसमधुन बाहेर पडता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे अपघात वाचलेल्या दोघांनी सांगितले.  

तर व्योमा ग्राफिक्सचे प्रविण रमेश कापडे (वय ३२) यांच्याकडे चौकशी केली. ' बसवरील चालक जनार्दन हुंबर्डीकर हे विचित्र स्वभावाचे होते. गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी शुल्लक कारणांवरुन कंपनीच्या कामगारांसोबत वेळोवळी वाद घातला. एक दिवस अगोदर जनार्दनमामा डब्बा घेवुन जात असताना मी आणि गोडसेसरांच्या केबिन बाहेर उभा होतो. तेंव्हा जनार्दन मामा म्हणत होते की, 'हे सगळे लयभारी झालेले आहेत. यांच्याकडे बघतोच, एकएकेची वाट लावतो, असे बोलल्याचे मी ऐकले होते, असे कापडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. गोवलं जात असल्याचा पत्नी आणि भावाचा आरोप जळीत हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी चालक जनार्दन हंबर्डीकर उर्फ मामा याच्याविरुद्ध कट रचून खून केल्याचे गुन्हे दाखल केला आहे. मात्र, जनार्दन याला गोवलं जात असल्याचा आरोप त्याची पत्नी आणि भावाने केला आहे. वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटले नाही!''ज्या बसला आग लागली, त्यामध्ये आरोपी जनार्दनचे सख्खे भावजी देखील होते, त्यामुळे ते आग कशी लावतील. शिवाय घटनेत वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटले देखील नाही. त्यामुळे पेटत्या बसमधून ते सुखरूप बाहेर कसे पडले? आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावण्यासाठी केमिकल आणतांना त्यांना कंपनीतील कुणीच का रोखले नाही, असे अनेक प्रश्न जनार्दन हंबर्डीकरच्या कुटुंबियांनी उपस्थित केले आहेत. 

जी कारणे सांगितली जात आहेत. बोनस मिळाला नाही इतर काही गोष्टी त्यापैकी काहीच माझ्या नवऱ्याने मला सांगितलेलं नाही. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. जर त्यांना पैसे मिळाले नसते तर त्यांनी मला पैसे दिले नसते. ते शुगर पेशंट होते. त्यांना या प्रकरणात गोवलं जात आहे. नक्की काय खरं आहे खोटं आहे, याचा तपास झाला पाहिजे. नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे.  - नेहा हंबर्डीकर (पत्नी)

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPoliceपोलिसhinjawadiहिंजवडीArrestअटकPune Crimeपुणे क्राईम बातम्या