शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

हेलिकॉप्टर बनविणारा उद्योगनगरीत आश्रयाला, संशोधनासाठी हवे आर्थिक बळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 2:22 AM

दहावीपर्यंत शिकलेल्या तरुणाने हॅलिकॉप्टर बनविले असून, तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकानजीक असलेल्या मोटार गॅरेजमध्ये उभे केले आहे. या भागातून येणा-या जाणा-यांचे हे हेलिकॉप्टर लक्ष वेधून घेत आहे.

तळवडे - दहावीपर्यंत शिकलेल्या तरुणाने हॅलिकॉप्टर बनविले असून, तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकानजीक असलेल्या मोटार गॅरेजमध्ये उभे केले आहे. या भागातून येणा-या जाणा-यांचे हे हेलिकॉप्टर लक्ष वेधून घेत आहे. हे हेलिकॉप्टर खरे की खोटे, ते आकाशात कसे भरारी घेते, अशा एक ना अनेक प्रश्न उत्सुकतेने बघणारे नागरिक विचारत आहेत.वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे दहावीपर्यंत शिकलेल्या प्रदीप मोहिते या तरुणाने शालेय शिक्षण सोडल्यानंतर अभियांत्रिकीची आवड असल्याने जीप, ट्रॅक्टर, मोटार दुरुस्त करण्याचे गॅरेज सुरू केले. ते करीत असतानाच त्याने संपूर्ण भारतीय बनावटीचे हेलिकॉप्टर तयार करण्याचा निर्धार केला. त्यासाठी मन लावून साहित्या जमवून हेलिकॉप्टर बनविले आणि ते काही प्रमाणात हवेत उडविले देखील.हळूहळू एका पाठोपाठ नवनवीन सुधारणा करत प्रदीपने आतापर्यंत जवळपास सात हेलिकॉप्टर बनविली आहेत. पहिल्या हेलिकॉप्टरचे वजन ७०० किलोग्रॅम, तर आता बनविलेल्या हेलिकॉप्टरचे वजन २५० किलोग्रॅम आहे. हेलिकॉप्टर बनविण्यासाठी त्याने दिवसरात्र मेहनत घेतली आहे. सध्या त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टरमध्ये ३०० फुटांपर्यंत उंच उड्डाण घेण्याची क्षमता आहे.प्रायोगिक तत्त्वावर बनविलेल्या सेवन फायटर हेलिकॉप्टरमध्ये आणखी सुधारणा करणे गरजेचे आहे. परंतु संशोधन करण्यासाठी आर्थिक पाठबळ असायला हवे, अशी अपेक्षा मोहिते यांनी व्यक्त केली. गावाकडे कोणाकडून विशेष मदत होत नसल्याने त्याने थेट पिंपरी-चिंचवड गाठले आहे.आणखी संशोधनाची जिद्दआतापर्यंत प्रदीपने बनविलेल्या हेलिकॉप्टरच्या सॉस प्लेट, इंजिन, अ‍ॅटोमॅटीक क्लच, पायलट ट्रेनिंग ब्रॅकेट, चेन ड्राइव्ह या पार्टला पेटंट मिळाले असून यासाठी वकील उर्मिला जाधव यांनी मदत केली आहे. ड्रोन, फ्लाइंग कार तसेच भारतीय सैन्यासाठी सुरक्षित कम्वो हेलिकॉप्टर बनविण्याची जिद्द प्रदीप मोहिते या तरूणाने बाळगलेली आहे. सेवन फायटर हेलिकॉप्टरमध्ये आणखी सुधारणा करणे गरजेचे आहे. परंतु संशोधन करण्यासाठी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत मोहिते आहे.अडचणी : आर्थिक चणचणीमुळे दुर्लक्षहेलिकॉप्टर बनविण्याच्या हौसेने झपाटलेल्या प्रदीपला आर्थिक अडचण भासत आहे. त्यामुळे संशोधनाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिकनगरीत गॅरेजच्या व्यवसायात जम बसेल, त्यातून येणाऱ्या पैशाचा हेलिकॉप्टरच्या संशोधनासाठी वापर करता येईल, या उद्देशाने ते औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आले. तरी राज्य व केंद्र शासन यांनी मेक इन इंडियांतर्गत हेलिकॉप्टरच्या संशोधनास मदत करावी, तसेच एखाद्या उद्योजकाने माझ्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला आर्थिक पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा असल्याचे प्रदीप मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या