शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीच्या हौसेसाठी त्यांनी सुरु केला चोरीचा उद्योग; २६ मोबाईल, तीन दुचाकी केल्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 17:32 IST

दोघे चोरटे जाळ्यात; ४ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज जप्त

पिंपरी : मैत्रिणीची हौस पुरविण्यासाठी दोघांनी चक्क मोबाईल चोरीचा उद्योग सुरु केला. दरोडा विरोधी पथकाने दोघा चोरट्यांना जेरबंद करुन, त्यांच्याकडून तब्बल २६ मोबाईल फोन आणि तीन दुचाकी जप्त केल्या. ही दुकली मैत्रिणीला वेळोवेळीवेगळा मोबाईल देत तिच्यावर पाडत असल्याचे तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी सागर मोहन सावळे (वय २२, रा. अष्टविनायक चौक, मोरे वस्ती, चिखली), नीलेश देवानंद भालेराव (वय १९, रा. नेवाळे वस्ती, घरकुल, चिखली) यांना जबरी चोरीच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन चोरीच्या दुचाकी, २६ मोबाईल फोन असा ४ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. दुचाकीवरुन आलेले चोरटे पादचाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेण्याच्या आणि सोनसाखळी चोरी, वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उकल न झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमले होते.

भोसरीतील पीएमपी बस थांब्याजवळील पुलाखाली मोबाईल हिसकावणारे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना खबऱ्याने दिली होती. त्या नुसार दरोडा विरोधी पथकाने तीन पथके नेमून सापळा रचला. तब्बल सहा तासांच्या प्रतिक्षेनंतर संशयित जाळ्यात अडकले. त्यांच्याकडे आठ मोबाईल आणि एक दुचाकी आढळली. अधिक तपासात त्यांनी २ लाख ४२ हजार रुपये किंमतीचे २६ मोबाईल फोन आणि १ लाख ७० हजार रुपयांच्या तीन दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. मैत्रिणीवर छाप पाडण्यासाठी ते मोबाईल फोन चोरत होते. ते, मैत्रिणीला वेळोवेळी फोन बदलून द्यायचे. तसेच काही फोनची विक्री करुन मौज मजा करत असल्याचे तपासात समोर आले आहे. पिंपरीतील तीन, एमआयडीसी भोसरीतील दोन, भोसरी पोलीस ठाण्यातील तीन आणि शिरवळ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची उकल झाली आहे.

---------------मोबाईल फोन हिसकावल्यास येथे संपर्क करारस्त्याने पायी जात असताना मोबाईल फोनवर बोलताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी. आजुबाजुला लक्ष द्यावे. ज्यांचे मोबाईल हिसकावले आहेत, त्यांनी दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या कासारवाडी येथील कार्यालयाच्या ८८०५३३३०३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिसArrestअटक