पिस्तूल नकली आहे असे म्हणताच त्याने केला गाेळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 01:12 PM2020-03-02T13:12:44+5:302020-03-02T13:42:52+5:30

पिस्तुल खरे की खाेटे या वादातून केलेल्या गाेळीबारात एकजण जखमी झाल्याची घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे.

he opend a fire because victim says pistol is fake rsg | पिस्तूल नकली आहे असे म्हणताच त्याने केला गाेळीबार

पिस्तूल नकली आहे असे म्हणताच त्याने केला गाेळीबार

Next

पिंपरी : पिस्तूल खोटे असल्याचे सांगितल्याने एकाने त्याच पिस्तुलातून गोळीबार केला. यात तरूण गंभीर जखमी झाला आहे. मिलिंद नगर, पिंपरी येथे सोमवारी (दि. २) ही घटना घडली.गुरुप्रीत हरदेवसिंग जावंद (वय २२, रा. मिलिंद नगर, पिंपरी), असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी परदेशी/रोकडे (वय २७, रा. थेरगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुरुप्रीत व त्याचा मित्र सिद्धांत सुनील बहोत (वय २१, रा. मिलिंद नगर, पिंपरी) हे दोघे रविवारी रात्री उशिरा रिक्षामध्ये बिअर पित गप्पा मारत बसले होते. त्यावेळी रात्री सव्वाबाराच्या सुमारास आरोपी सनी तेथे आला. तो देखील फिर्यादी गुरुप्रीत व सिद्धांत यांच्यासोबत बिअर पित बसला. त्यावेळी त्याच्या कमरेला असलेले पिस्तूल त्याने फिर्यादी गुरुप्रीत व सिद्धांत यांना दाखविले. पिस्तूल नकली आहे, असे फिर्यादी गुरुप्रीत म्हणाला. त्यामुळे आरोपी सनी याला राग आला. त्याने चिडून जाऊन फिर्यादीला शिवीगाळ केली. पिस्तूल लोड करून जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी गुरुप्रीत याच्यावर गोळीबार केला. यात त्याच्या डाव्या खांद्याला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: he opend a fire because victim says pistol is fake rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.