शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

देहूगावामध्ये भरली हरिनामाची शाळा

By admin | Updated: July 5, 2017 03:05 IST

येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व शिळा मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. आषाढी एकादशीचे महत्त्व लक्षात

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव : येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व शिळा मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. आषाढी एकादशीचे महत्त्व लक्षात घेऊन देहू पंचक्रोशीतील भाविकांसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व श्री संत तुकाराममहाराज शिळामंदिरात दर्शन घेतले. दर्शनासाठी पहाटेपासूनच येथील मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. ती गर्दी दुपारनंतर हळूहळू वाढतच गेली. पहाटे संस्थानचे मुख्य पुजारी धनंजय मोरे यांनी साडेचार वाजता महापूजा व काकड आरती केली. पाच वाजण्याच्या सुमारास शिळामंदिरातील नैमित्तिक विधीवत महापूजा केली. महापूजा उरकल्यानंतर भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. भाविकांच्या गर्दीमुळे देहूनगरीदेखील फुलून गेली होती. परिसरातील काही शाळांनी देखील एकादशीचा दिवस साधत दिंडीने मंदिरात येऊन दर्शन घेतले. दुपारनंतर स्थानिक भाविकांनीही मोठी गर्दी केली होती. त्याच प्रमाणे जे भाविक थेट पंढरपूरच्या वारीला दाखल झाले होते त्यांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी देहू व आळंदी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालय व तळवडे येथील ज्ञानदीप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपापल्या पालखीसह दिंड्या देहूमध्ये आणल्या होत्या. मंदिराच्या आवारात त्यांनी विविध अभंगांचे गायन करीत मंदिर प्रदक्षिणा घालून आपल्या विद्यालयाकडे मार्गस्थ झाले. माळीनगर येथील श्रीकृष्ण महिला भजनी मंडळाने मंदिरात भजन गायन करीत सेवा रुजू केली. दुपारी आलेल्या भाविकांना एकादशीनिमित्त खिचडी व केळी वाटप तुषार बहिरट पाटील,सर्जेराव भोंगाडे, संकेत जाधव, विदूर पचपिंड, दीपक पिंजण, साजिस लबडे,गणेश माळी, प्रशांत शिवणेकर यांनी मंदिराच्या आवारात केले.रात्री सात ते नऊपर्यंत पुरुषोत्तममहाराज मोरे यांचे ‘आता कोठे धावे मन’, ‘तुझे चरण देखलिया’ या अभंगाचे निरुपण करीत कीर्तनसेवा केली. गर्दीमुळे व आठवडे बाजार असल्यामुळे मंदिरापुढे वाहनांची मोठी गर्दी झाली. नवलाख उंब्रे : ग्रामपंचायतीतर्फे वृक्षदिंडीवडगाव मावळ : नवलाख उंबरे ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण केले. या वेळी मुलांनी वारकरी, तसेच विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा केली होती. या वेळी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते भरत ढमाले यांनी भोजन व्यवस्था केली होती. या वेळी सरपंच दत्तात्रय पडवळ, रवींद्र कडलक, सदस्य संदीप शेटे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वायकर, नवनाथ पडवळ, सुभाष पापळ, तानाजी पडवळ, दिनकर शेटे, चिंधू बधाले, बाळासाहेब लोणकर, मुख्याध्यपक विजय चव्हाण उपस्थित होते. कडलक यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संदीप शेटे व आभार विजय चव्हाण यांनी मानले. सरपंच दत्तात्रय पडवळ, दिनकर शेटे व बाळासाहेब लोणकर यांनी मनोगत व्यक्त केले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने कामशेत शहरात असलेल्या गावठाणमधील विठ्ठल रखुमाई मंदिरात सकाळपासून भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यात मंगळवारी आठवडे बाजार भरत असल्याने भाजीपाला विक्रेत्यांनीही या वेळी विठ्ठल रखुमाई दर्शनाचा लाभ घेतला. कामशेत शहरातील विठ्ठल रखुमाईचे मंदिर जुने असून सकाळी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला अभिषेक करून विधियुक्त पूजा करण्यात आली. महाप्रसाद व भजनाचे कार्यक्रम झाले. विठू नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.