शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

घटस्फोट खटल्याची हॅप्पी एंडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 06:48 IST

खटला अंतिम टप्प्यात असताना पुन्हा जुळला सूर

पुणे : न्यायालयातघटस्फोटासाठी गेलेला खटला जोडप्याची ताटातूट झाल्यानंतरच संपतो. त्यानंतर मुलांच्या हक्कावरून व पोटगीवरून पुन्हा वाद होत असल्याची परिस्थिती आहे. मात्र प्रत्येक प्रकरणात असेच होईल असे नाही. अगदी सिनेमाची स्टोरी शोभावी, असे वळण पूनम आणि प्रवीण (नावे बदललेली) यांच्या घटस्फोटाच्या खटल्याने घेतली असून, त्यांचे हॅप्पी एंडिंग झाले आहे.दावा दाखल करणे, त्यानंतर त्यांचे समुपदेशन आणि शेवटी निकाल असे घटस्फोटाचे साधारण तीन टप्पे आहेत. पूनम व प्रवीण यांचा खटला अंतिम टप्प्यात असताना त्यांना केलेल्या समुपदेशनामुळे दोघांनीही पुन्हा एकत्र येण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांच्या चिमुकल्या मुलालादेखील आई-वडिलांचा सहवास लाभणार आहे.या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पूनम व प्रवीण यांचे २४ जानेवारी २०१३ रोजी लग्न झाले होते. प्रवीण औषध वितरण कंपनीत कामाला तर पूनम ही गृहिणी आहे. सुमारे एक वर्ष त्यांचा संसार सुखात सुरू होता. मात्र त्यानंतर त्यांच्यात मतभेद होऊ लागले व त्याचे रुपांतर भांडणात झाले. पूनम ही त्यांच्या घरच्या व्यक्तींच्या सांगण्याप्रमाणे वागत आहे. याकाळात त्यांना एक बाळही झाले. वाद अगदी टोकाला गेल्याने २०१६ साली पूनम यांनी माहेरचा रस्ता धरला व सासरच्या व्यक्तींविरोधात खटला दाखल केला.घटस्फोटाचे प्रकरण अंतिम युक्तीवादास ठेवण्यात आले होते. मात्र प्रविण यांचे वकील अ‍ॅड. झाकीर मनियार यांनी दोघांचेही समुपदेशन केले. त्यांना संसार मोडण्याच्या हट्टापासून परावृत्त केले व त्यांच्यातील गैरसमज देखील मिटवले. एवढेच नाही तर त्यांच्यात असलेली सुडाची भावना देखील संपवली. त्यातून दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचे ठरवले. दोघांकडील कुटुंबियांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

टॅग्स :Divorceघटस्फोटmarriageलग्नCourtन्यायालयrelationshipरिलेशनशिप