पक्ष्यांसाठी अर्धा एकर ज्वारीचे पीक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 01:40 AM2019-03-20T01:40:53+5:302019-03-20T01:44:02+5:30

आपण घरात प्राणी-पक्षी पाळून त्यांना पाणी, चारा देऊन त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो; पण सद्य:स्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे.

 Half acre jowar crop for birds | पक्ष्यांसाठी अर्धा एकर ज्वारीचे पीक

पक्ष्यांसाठी अर्धा एकर ज्वारीचे पीक

googlenewsNext

चाकण  - आपण घरात प्राणी-पक्षी पाळून त्यांना पाणी, चारा देऊन त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो; पण सद्य:स्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे.

या पार्श्वभूमीवर खराबवाडीतील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर ऊर्फ बाबासाहेब शिवराम कड या शेतकऱ्याने अर्धा एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक चक्क पक्ष्यांना खाण्यासाठी राखून ठेवले आहे. ज्वारीच्या उत्पन्नाचा त्याग करून त्यांनी दाखविलेल्या पक्षीमायेचे पक्षीप्रेमींमधून त्यांचे कौतुक होत आहे.

ज्ञानेश्वर कड यांची खराबवाडी परिसरात चार एकर शेती आहे. यातील अर्धा एकर क्षेत्रात त्यांनी ज्वारीचे पीक घेतले आहे. या सर्व क्षेत्रांतील ज्वारीचे उभे पीक कड यांनी पक्ष्यांसाठी राखून ठेवले आहे. सध्या त्यांच्या ज्वारीच्या पिकात अनेक प्रकारचे पक्षी सकाळ-संध्याकाळ येत असतात. काही पक्ष्यांनी तर या ठिकाणी असलेल्या मोठ्या झाडांवर आपली घरटी केली आहेत. कड यांनी शेजारीच असलेल्या
नारळाच्या झाडांना मडकी बांधली आहेत. जेणेकरून पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे.

आज राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पक्ष्यांना चारा व पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे; तसेच वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या राहण्याबरोबरच त्यांच्या खाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील ज्वारीचे पीक पक्ष्यांना दान करण्याचा निर्णय आमच्या कुटुंबातील सदस्यांनी घेतला असून, ज्वारीच्या उत्पादनाचा त्याग करून ते पक्ष्यांसाठी राखून ठेवत आहे.
- ज्ञानेश्वर ऊर्फ बाबासाहेब कड, प्रगतिशील शेतकरी

Web Title:  Half acre jowar crop for birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.