शहरं
Join us  
Trending Stories
1
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
2
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
3
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
4
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
6
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
7
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
8
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
9
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
10
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
11
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
12
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
13
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
14
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
15
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
16
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
17
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
18
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
19
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
20
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल

पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून मावळ तालुक्यातील चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 4:08 PM

निसर्ग चक्रीवादळ व पावसाने झालेल्या अतोनात नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या आयोजित बैठकीत योग्य ते निर्णय घेवून मदत

वडगाव मावळ : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे असे मत मावळ तालुक्यात नुकसानी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व्यक्त केले. मावळ तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांत निसर्ग चक्रीवादळ व पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या अतोनात नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा अजित पवार यांनी शुक्रवारी केला. यावेळी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रांत संदेश शिर्के, तहसीलदार मधुसुदन बर्गे, गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र माळी, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्यासह पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते. आंबी एमआयडीसी परिसरात झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. त्यानंतर मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी येथील झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही पाहणी केली. निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी घरावरील, शाळेवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच विद्युत खांब पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.अनेक ठिकाणी झाडे पडल्याने देखील मोठे नुकसान झाले आहे. मावळ तालुक्यात फुलशेती आणि अन्य शेतीसाठी पॉलिहाऊस वापरले जातात. या वादळात पॉलिहाऊसचे देखील नुकसान झाले आहे.शनिवारी दि. ६ रोजी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात योग्य ते निर्णय घेवून मदत केली जाणार आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मदत मागितली असून केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी येणार असल्याचेही पवार म्हणाले.

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरीCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळNavalkishor Ramनवलकिशोर राम