महाराष्ट्र सहकार विकास मंडळाची 'भारी' कामगिरी; २०० उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 14:42 IST2021-03-30T14:41:58+5:302021-03-30T14:42:06+5:30
शेतकऱ्यांना दहा टन खतांचा रास्त दराने पुरवठा...

महाराष्ट्र सहकार विकास मंडळाची 'भारी' कामगिरी; २०० उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ दिली
पिंपरी : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने दोनशे शेतकरी उत्पादक कंपन्यांना कॉप शॉपच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली. तसेच शेतकऱ्यांना दहा हजार टन खतांचा रास्त दराने पुरवठा केला आहे.
सहकार विकास महामंडळाची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यात महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पणन संचालक सतीशकुमार सोनी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, तज्ज्ञ संचालक गोकुळ राठी या वेळी उपस्थित होते.
महामंडळाने २०१९-२० या वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा या वेळी घेण्यात आला. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेला कृषी माल राज्यातील दोनशे शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळाली बाजारपेठआणि कृषी प्रक्रिया उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम महामंडळांच्यामार्फत करण्यात आले. त्याचबरोबर पावणेदोनशे कृषी कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रास्त दरात दहा हजार टन खतांचा पुरवठा करण्यात आला. महामंडळाने गेल्या वर्षभरात दीड लाख रुपयांचा नफा कमावला. तसेच, राज्यात कृषी उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सूक्ष्म व लघु उद्योगांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन सेवा पुरविण्यात येणार असून, पर्यटन समन्वयक म्हणून ही काम करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सहकार विकास महामंडळाकडून सांगण्यात आले.