Pimpri Chinchwad: ‘‘माहेरच्यांकडे जास्त लक्ष देते...’’; गळा आवळून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न
By नारायण बडगुजर | Updated: April 6, 2024 16:10 IST2024-04-06T16:10:33+5:302024-04-06T16:10:49+5:30
मुळशी तालुक्यातील बावधन बुद्रुक येथे कांबळे वस्तीत शुक्रवारी (दि. ५) हा प्रकार घडला....

Pimpri Chinchwad: ‘‘माहेरच्यांकडे जास्त लक्ष देते...’’; गळा आवळून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न
पिंपरी : माहेरच्या लोकांकडे जास्त लक्ष देते असा राग मनात धरून दोरीने गळा आवळून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केला. मुळशी तालुक्यातील बावधन बुद्रुक येथे कांबळे वस्तीत शुक्रवारी (दि. ५) हा प्रकार घडला.
रेखा श्रीरंग कापसे (२७, रा. कांबळे वस्ती, बावधन बुद्रुक, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. श्रीरंग पांडुरंग कापसे (रा. कांबळे वस्ती, बावधन बुद्रुक, ता. मुळशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरंग कापसे हा फिर्यादी रेखा यांचा पती आहे. रेखा यांच्यावर संशय घेऊन ती माहेरच्या लोकांच्याकडे जास्त लक्ष देते, असा राग श्रीरंग याला होता. त्या रागातून त्याने त्याने रेखा यांचा गळा दोरीने आवळला. त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.