Pimpri Chinchwad: टोळक्याकडून तरुणावर तलवार, कोयत्याने वार, पिंपरीतील घटना
By नारायण बडगुजर | Updated: January 8, 2024 09:06 IST2024-01-08T09:06:04+5:302024-01-08T09:06:44+5:30
पिंपरीतील महेशनगर, नेहरुनगर येथे शनिवारी (दि. ६) ही घटना घडली...

Pimpri Chinchwad: टोळक्याकडून तरुणावर तलवार, कोयत्याने वार, पिंपरीतील घटना
पिंपरी : मित्राला मारहाण केल्याचे समजून टोळक्याने तरुणावर तलवार व कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला. पिंपरीतील महेशनगर, नेहरुनगर येथे शनिवारी (दि. ६) ही घटना घडली.
तोहीद अस्लम शहा (२१, रा. नेहरुनगर) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सलीम पटेल, सुनील बग्गी, जुबेर शेख, शुभम दुबे (सर्व रा. कासारवाडी), सुशांत सोनवणे (रा. बाेपोडी) तसेच इतर पाच ते सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व संशयित शनिवारी दुचाकीवरून महेशनगर, नेहरुनगर येथे आले. फिर्यादी तोहीद शहा यांनी त्यांच्या मित्राला मारहाण केली असल्याचे समजून तलवारीने व काेयत्याने वार केला. वार चुकवताना फिर्यादी शहा यांच्या हाताला मार लागला. तसेच त्यांना हाताने व पायाने मारहाण करून शिवीगाळ केली.