शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

भरदिवसा दरोड्याच्या तयारीतील चौघा जणांची टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 20:25 IST

भरदिवसा कंपनीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव चाकण पोलिसांनी उधळून लावला.

पिंपरी : भरदिवसा कंपनीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव चाकण पोलिसांनी उधळून लावला. टोळीतील चार जणांना पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास खालूंब्रे गावाजवळ मेरियट हॉटेलसमोर घडली आहे.चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग किसन पडवळ (वय २९, रा. पडवळ वस्ती, शेलू चाकण), अबिद मोहम्मद शब्बीर हुसैन (वय ३२, रा. पुरेना, तुलसीपूर, जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश), मकसूद बिसमिल्ला खान (वय ३२, रा. घाटकोपर, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सलीम (रा. कळंबोली, ठाणे) हा पसार आहे.पोलीस शिपाई शरद शांताराम खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून वासुली येथील एमआयडीसी परिसरातील कंपनीत दरोडा टाकण्याचा कट रचला होता. हा दरोडा टाकण्यासाठी त्यांनी संपूर्ण तयारी केली. चाकण पोलिसांना माहिती मिळाली की, खालूंब्रे गावाजवळ एच. पी. चौकात मेरीयट हॉटेल समोर काहीजण संशयितरित्या फिरत आहेत. जवळच असलेल्या कंपनीची ते रेकी करत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांचा एक साथीदार पळून गेला.ह्णह्णकसून चौकशी सुरूएमआयडीसी परिसरातील कंपनीत दरोडा टाकण्याचा कट रचनाणाºया आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.  ताब्यात घेतलेल्या चार जणांकडून घातक शस्त्र, लोखंडी कटावणी, हेक्सा ब्लेड, मिरची पावडर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यातून आणखी काही गुन्हे उघड होण्याच्या दृष्टीने चाकण पोलीस तपास करीत आहेत

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस